मालवणातून बेपत्ता मुलगा ठाणे येथे सापडला

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मालवण - शहरातील धुरीवाडा येथून बेपत्ता झालेला हर्शल नीलेश पणदूरकर (वय १३ मूळ रा. तारकर्ली) हा काल (ता. १) रात्री ठाणे येथे समता फाऊंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आला. त्याला पोलिस ठाण्यातून बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

मालवण - शहरातील धुरीवाडा येथून बेपत्ता झालेला हर्शल नीलेश पणदूरकर (वय १३ मूळ रा. तारकर्ली) हा काल रात्री ठाणे येथे समता फाऊंडेशन या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आढळून आला. त्याला पोलिस ठाण्यातून बालसुधार गृहात ठेवण्यात आले होते. आज सायंकाळी त्याला नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आले.

टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षण घेणारा हर्शल हा बुधवार (ता. ३१)पासून बेपत्ता होता. त्याचा कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. मात्र, तो सापडला नाही. तो बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी केलेल्या तपासात त्याच्या दप्तरमध्ये चिठ्ठी सापडली होती. यात त्याने आपण कामानिमित्त मुंबई येथे जात असल्याचे म्हटले होते.

पोलिसांना काल कणकवली रेल्वेस्थानकात त्याची सायकलही आढळून आली होती. येथून बेपत्ता असल्याची माहिती ठाणे येथील समता फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना मिळताच त्यांनी हर्शलचा शोध घेत त्याला पोलिस ठाण्यात नेले. तेथून त्याची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. हर्शलचे नातेवाईक आज मुंबईत गेल्यानंतर त्याला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले. नातेवाईक त्याला घेऊन येथे येण्यास रवाना झाले आहेत.

Web Title: Sindhudurg News missing boy found in Thane