मोती तलावाचा कठडा मोडकळीस

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

सावंतवाडी - शहराच्या सौंदर्याचे नाक असलेल्या मोती तलावाचा कोर्ट परिसरातील कठडा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याची डागडुजी तांत्रिक बाबीत अडकली आहे. याआधी मोती तलावाच्या संवर्धनासाठी आलेला साडेतीन कोटीचा निधी परत गेला आहे. याबाबत नागरिकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे लक्ष वेधले.

सावंतवाडी - शहराच्या सौंदर्याचे नाक असलेल्या मोती तलावाचा कोर्ट परिसरातील कठडा कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. याची डागडुजी तांत्रिक बाबीत अडकली आहे. याआधी मोती तलावाच्या संवर्धनासाठी आलेला साडेतीन कोटीचा निधी परत गेला आहे. याबाबत नागरिकांनी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांचे लक्ष वेधले. धोकादायक झालेला काठ मजबूतीकरण करण्यासाठी पालिका प्रशासन किंवा महाराष्ट्र शासन यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे श्री. साळगावकर यांचे मत आहे.

तलावाच्या राजवाड्यापासुन न्यायालयाच्या आवाराकडे जाणाऱ्या मुख्य कठड्याला भेगा पडल्या आहेत. पलीकडे सबनीसवाडा आहे. त्याठिकाणी मोठी वस्ती आहे. त्यामुळे हा काठ भविष्यात तुटल्यास धोका उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. याबाबत काही नागरिकांनी श्री. साळगावकर यांचे लक्ष वेधले.

याबाबत श्री. साळगावकर म्हणाले, ""तलावाच्या दुरूस्तीसाठी शासनाकडुन साडेतीन कोटी रूपये सरोवर संवर्धन या योजनेतून मंजूर झाले होते; मात्र तलावाबाबतचा दावा न्यायालयात सुरू आहे. या तांत्रिक बाबीमुळे निधी परत गेला.''

ते म्हणाले, ""सद्यस्थिती लक्षात घेता तलावाची डागडुजी होणे गरजेचे आहे. त्यासाठी सावंतवाडी पालिका किंवा शासनाने पुढाकार घेण्याची गरज आहे. सद्यस्थिती लक्षात घेता दोन सांडव्यापैकी राजवाड्यासमोरील सांडवा पुर्णतः बंद झाला आहे. बापुसाहेब महाराज पुतळ्याकडील एकमेव सांडवा सुरू आहे.''

विसर्ज कट्ट्याचे काम चुकीचे
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, ""दहा ते बारा वर्षापुर्वी तलावाच्या काठी उभारण्यात आलेल्या गणपती विसर्जन कट्ट्याचे चुकीच्या पद्धतीने काम झाले. यामुळे पाणीसाठ्याची जागा कमी झाल्याने उन्हाळ्यात टंचाई जाणवते. त्यामुळे कट्ट्याची उंची वाढविणे गरजेचे आहे.''

Web Title: Sindhudurg News Moti Talav compound wall issue