सावंतवाडीत 27 पासून मोती तलाव फेस्टीव्हल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सावंतवाडी - सजग नागरिक मंच आणि येथील पालिका यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा चौथा मोती तलाव फेस्टीव्हल 27 ते 30 या काळात होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

सावंतवाडी - सजग नागरिक मंच आणि येथील पालिका यांच्यावतीने आयोजित करण्यात येणारा चौथा मोती तलाव फेस्टीव्हल 27 ते 30 या काळात होणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

उपनगराध्यक्ष अन्नपुर्णा कोरगावकर, नगरसेवक बाबू कुडतरकर, अनारोजीन लोबो, भारती मोरे, माधुरी वाडकर, सुरेंद्र बांदेकर, राजू बेग, मंचाचे सरोज दाभोळकर, दिलीप धोपेश्‍वरकर, अद्वैत नेवगी आदी उपस्थित होते.

महोत्सवाचे वेगळेपण - 

  • राजस्थान येथील राम अवतार सिंग यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या बियांच्या दागिन्यांचे स्टॉल मांडण्यात येईल. ते दागिने कसे तयार करण्यात येतात याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.
  • काश्‍मीर येथील मुहम्मद शेख यांचा कॉस्मेटीक वस्तू आणि काश्‍मीरमधील उत्पादने याबाबत विक्री स्टॉल लावण्यात येणार आहे.
  • शहरातील अद्वैत नेवगी या युवकाने तयार केलेले बेलाच्या फळाचे आईस्क्रीमचा समावेश.
  • नारूर येथील शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाची विक्री. यात भाजी, बियाणे, फळे, फुले आदींचा समावेश. 
  • वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राचा स्टोन पेंटीगची माहिती देणारा स्टॉल 
  • वेंगुर्ले येथील कांदळवनाची सफर घडवून आणणाऱ्या स्वामिनी महिला बचत गटाचा स्टॉल
  • कोलगाव येथील ईश प्रेमालया कॅन्सर हॉस्पीटलचा जनजागृती विषयक स्टॉल

दरवर्षी प्रमाणे यावेळी सुध्दा या फेस्टीव्हलचे वेगळेपण जपण्यात आले आहे. यात सहभागी होणाऱ्या लोकांसाठी विविध प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या महोत्सवाला उपस्थित रहावे

- बबन साळगावकर, नगराध्यक्ष

Web Title: Sindhudurg News Moti Talav Festival from 27 April