विहिर खुली करण्यासाठी मडुऱ्यातील वृद्धचे उपोषण 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

सावंतवाडी - शासकीय जमिनीत असलेल्या विहिरीत माती टाकुन ती बुजविल्याचा प्रकार मडुरा गावात घडला आहे. आपण त्या विहीरीचे पाणी वापरतो. त्यामुळे ती विहीर पुन्हा खुली करून द्यावी, अशा मागणीसाठी गावातील 80 वर्षीय वृध्देने येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले.

सावंतवाडी - शासकीय जमिनीत असलेल्या विहिरीत माती टाकुन ती बुजविल्याचा प्रकार मडुरा गावात घडला आहे. आपण त्या विहीरीचे पाणी वापरतो. त्यामुळे ती विहीर पुन्हा खुली करून द्यावी, अशा मागणीसाठी गावातील 80 वर्षीय वृध्देने येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर उपोषण केले.

विहीर नेमकी कोणाच्या मालकीची आहे? याबाबत माहिती घेवून पुढील भूमिका घेतली जाईल, असे आश्‍वासन सहायक अभियंता अनिल आवटी यांनी दिले आहे. विहीर खुली करा, अन्यथा संबंधित माती टाकणाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेच्या महीला पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

तालुक्‍यातील मडुरा गावातील डिगवाडी परिसरात ही विहीर आहे. विहीर असलेली जागा नियोजित रस्त्याच्या रूंदीकरणासाठी संपादित केली आहे; मात्र त्याठिकाणी राहणाऱ्या व्यक्तीने संबंधित विहीर आपल्या दारात असल्याचे सांगुन त्यात माती टाकून ती बूजवून टाकली आहे; त्या विहिरीचे पाणी पिणाऱ्या लुईजा फर्नांडीस या वृद्धेच्या म्हणण्यानुसार गेली अनेक वर्षे आपण त्या विहिरीचे पाणी पीत आहोत. त्यामुळे वापरात असलेली विहीर बुजविणे चुकीचे आहे.

गावात नळपाणी योजना असली तरी आपल्या पर्यंत पाणी पोचत नाही. आपण विहीरीच्या पाण्यावर अवलंबून आहोत. त्यामुळे आत टाकण्यात आलेली माती बाहेर काढण्यात यावी, या मागणीसाठी फर्नांडीस यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी आज बांधकामकडे उपोषण केले. 

संबंधितांना न्याय देण्यात यावा. त्यात टाकण्यात आलेली माती काढुन टाकण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केली. संबंधित विहिरीत माती टाकणारी व्यक्ती कोण याबाबत माहिती नसेल तर पोलिसात तक्रार दाखल करून शोध घ्यावा, त्याच बरोबर तुर्तास बांधकाम विभागाने पुढाकार घेवून माती बाहेर काढावी, अशी मागणी केली. 

यावेळी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, शुभांगी सुकी, कमला मेनन, शब्बीर मणियार, प्रशांत कोठावळे, अर्पणा कोठावळे, निता सावंत आदी उपस्थित होते. 

आवटी म्हणाले, ""संबंधित विहिरीची जागा बांधकामने संपादित केली असली तरी ती आता नेमकी कोणाच्या मालकीची आहे याची माहिती घेण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.'' 

Web Title: Sindhudurg News old woman agitation in Madure