माणगावातील एक दुचाकी-टॅंकरच्‍या धडकेत ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 एप्रिल 2018

कुडाळ - मुंबई-गोवा महामार्गावर साळगाव येथे दुचाकी व टॅंकर यांच्या धडकेत एकजण ठार झाला. ज्ञानेश्‍वर रामचंद्र ताम्हाणेकर (वय ४८, रा. नमसवाडी, माणगाव) असे त्याचे नाव आहे. अपघात आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास झाला. महामार्ग चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर तालुक्‍यातील चौथा बळी आहे.

ताम्हाणेकर माणगावहून कुडाळला येत होते. टॅंकर कुडाळहून गोव्याकडे जात होता. साळगाव सावित्रीलीला मंगल कार्यालयाजवळ ते आले असता एका मोटारीने त्यांना हुल दिली. त्‍यांची दुचाकी मोटारीला घासली. सावरून ते रस्त्यावर येत असताना समोरून येणाऱ्या टॅंकरला एका बाजूने धडक बसली. त्‍यांचे डोके आदळले. मोठा रक्तस्राव झाला. ताम्हाणेकर यांचे माणगाव तिठा येथे ओंकार ट्रेडर्स हार्डवेअरचे दुकान आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर यांचे चुलतभाऊ होत. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, वडील असा परिवार आहे.

Web Title: Sindhudurg News one dead in an accident in Mangaon