सिंधुदुर्गात सुमारे 60 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

सिंधुदुर्गात सुमारे 60 हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा प्रशासनाने खरीप हंगामासाठी ६६९६ क्‍विंटल बियाण्याची तर १६ हजार टन खताची मागणी केली आहे. सुमारे ६० हजार हेक्‍टरवर या हंगामात शेती करण्याचे नियोजन केले आहे.

जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून, काही भागात दमदार पाऊस झाल्याने भात पेरणीच्या कामाला जोर चढला आहे. जिल्हा प्रशासनही खरीप हंगामासाठी सज्ज आहे. भात बियाणे व खत ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहे. खरीप हंगामासाठी प्रशासनाने सुधारित व संकरित वाणाच्या वापरासाठी बियाण्याची व रासायनिक खतांची उपलब्धता शेतकऱ्यांना करून देण्याचे नियोजन केले आहे.

खरीप हंगाम २०१८ साठी एकूण १६ हजार मे. टन खताची मागणी केली आहे. यामध्ये युरिया ७९२० मे. टन, डी. ए. पी. ११८० मे. टन, एस एस पी ११०० मे. टन, एमओपी ७४५ मे. टन, २०,२०००-८० मे. टन, १५,१५,१५-३२९० मे. टन, १०,२६,२६-२३५० मे. टन, १९, १९, १९-३७५ मे. टन, १८,१८,१०-२३०५ मे.टन, १०,१०,१०-२३०० मे.टन, १२,३२,१६-५३० मे.टन या प्रमाणे खताची मागणी आली आहे. जिल्हा प्रशासनाने खरीप २०१८ साठी ६६९६ क्‍विंटल बियाण्याची मागणी केली आहे.

पीक कर्ज वाटपाचेही नियोजन
२०१८ च्या खरीप हंगामात शेकऱ्यांना तब्बल २३ हजार ८३३ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जिल्हा बॅंक ७ हजार १६६ लाख, राष्ट्रीयीकृत बॅंका-१५ हजार ७५ लाख, ग्रामीण बॅंक-७७० लाख व इतर बॅंका मिळून ८२२ लाख रुपये कर्जाचे वाटप करणार आहेत. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने नियोजन केले आहे.

मागणी केलेली बियाणे
सह्याद्री( संकरित वाण), मसुरी, जया, सुवर्णा, रत्ना, कर्जत-२, कर्जत-३, कर्जत-५, कर्जत-७, कर्जत-१८४, बीपीटी-५२०४, श्रीराम, इंद्रायणी, भोगावती, रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४ ( सुधारित)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com