कोकण विद्यापीठाला शह देण्याच्या प्रयत्नाचा निषेध - प्रा. महेंद्र नाटेकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 एप्रिल 2018

कणकवली - रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाचे मृत उपकेंद्र सशक्त करून कोकण विद्यापीठाला शह देण्याचा सुरू असलेला प्रयत्न हास्यास्पद असून, त्याचा आम्ही निषेध करतो, असे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी म्हटले आहे.

कणकवली - रत्नागिरी येथील मुंबई विद्यापीठाचे मृत उपकेंद्र सशक्त करून कोकण विद्यापीठाला शह देण्याचा सुरू असलेला प्रयत्न हास्यास्पद असून, त्याचा आम्ही निषेध करतो, असे प्रा. महेंद्र नाटेकर यांनी म्हटले आहे. चाळीस वर्षांपूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील महाविद्यालये प्रथम पुणे व नंतर शिवाजी विद्यापीठाची निर्मिती झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाला जोडण्यात आली.

मात्र, त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचा दर्जा चांगला नसल्याने कोकणवासीयांच्या मागणीनुसार उत्तम दर्जा असलेल्या मुंबई विद्यापीठाला संलग्न करण्यात आली. मात्र, गेली काही वर्षे मुंबई विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा घसरत असल्याने रत्नागिरी येथे स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करीत आहोत. 

यावर्षी तर मुंबई विद्यापीठाच्या अनागोंदी कारभाराने कहर केल्याने विद्यार्थी, संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री, राज्यपाल आदींशी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष संपर्क साधून रत्नागिरी येथे स्वतंत्र कोकण विद्यापीठ व्हावे यासाठी आग्रह धरला.

प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी रत्नागिरी येथील विद्यापीठाचे उपकेंद्र सशक्त करून कोकण विभागाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे याचा आम्ही निषेध करतो. स्वतंत्र कोकण समितीच्या बैठकीत नाटेकर बोलत होते. यावेळी प्रा. पी. बी. पाटील, प्रा. सुभाष गोवेकर, जे. जे. दळवी, वाय. जी. देसाई आदी उपस्थित होते.

Web Title: Sindhudurg News Prof. Mahendra Natekar comment