रत्नागिरी-सिंधुदुर्गात पुलंचा जन्मशताब्दी सोहळा

राजेश सरकारे 
सोमवार, 11 जून 2018

कणकवली - महाराष्ट्राचे लाडके व्यक्‍तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत.

कणकवली - महाराष्ट्राचे लाडके व्यक्‍तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचा जन्मशताब्दी सोहळा रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्‍यात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. त्यासाठी या दोन्ही जिल्ह्यातील सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था एकत्र आल्या आहेत.

यंदा 8 नोव्हेंबर 2018 पासून पुलंच्या जन्मशताब्दीला प्रारंभ होत आहे. त्यानिमित्ताने प्रत्येक तालुक्‍यात 8 नोव्हेंबर या दिवशी एकाच वेळी पु. लं. च्या प्रसिद्‌ध कलाकृतींचे सादरीकरण होणार आहे. तर नंतरच्या वर्षभराच्या कालावधीत आणखीही विविध उपक्रम साजरे होणार आहेत, अशी माहिती रत्नागिरीतील आर्ट सर्कल या संस्थेचे पदाधिकारी नितीन कानविंदे यांनी दिली. 

पुलंच्या जन्मशताब्दी सोहळ्याबाबत आचरेकर प्रतिष्ठानच्या नाट्यगृहात पत्रकार परिषदे झाली. यावेळी आर्ट सर्कलचे श्रीरंग प्रभुदेसाई, मनोज देसाई, सुनील वनजू, संगीता वनजू, मित्र संस्था शिरगांवचे सचिन देसाई, सावंतवाडी क्षितिज संस्थेचे बाळ पुराणिक, आचरा येथील सुरेश ठाकूर, नवनाथ भोळे, माधव गावकर, आचरेकर प्रतिष्ठानचे वामन पंडित, शाम नाडकर्णी, मनोज मेस्त्री  उपस्थित होते. 

गेली 10 वर्षे आम्ही पुलोत्सव साजरा करत आहोत. पु. लं. ची जन्मशताब्दी जवळ आली असताना ती फक्‍त रत्नागिरीतच का? कोकणातल्या सर्वच तालुक्‍यात का नाही? या विचाराने कामाला सुरवात झाली आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध शहरात काम करणाऱ्या संस्थांशी आम्ही संपर्क साधला आणि साऱ्यांचेच होकार आले. 

- नितीन कानविंदे

पु. लं. च्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या संस्था - 

संस्कारभारती दापोली, संस्कारभारती खेड व आर्ट सोसायटी, लोकमान्य स्मारक चिपळूण, ज्ञानरश्‍मी वाचनालय गुहागर, अभिरुची देवरूख, मित्रमेळा राजापूर, संस्कृती-लांजा, वसंतराव आचरेकर प्रतिष्ठान कणकवली, बाबा वर्दम थिएटर कुडाळ, क्षितिज सावंतवाडी, साने गुरुजी कथामाला व अ. भा. नाट्यपरिषद मालवण, किरात वेंगुर्ले, आर्ट सर्कल देवगड, मित्र शिरगाव आणि आर्ट सर्कल रत्नागिरी या संस्था सहभागी झाल्या आहेत. 

Web Title: Sindhudurg News Pu La Deshpande Birth anniversary Celebration