कणकवलीत रेडीयमच्या दुकानाला आग

तुषार सावंत
बुधवार, 9 मे 2018

कणकवली - शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. 

कणकवली - शहरातील रेडीयमच्या दुकानाला अनोळखी व्यक्तीने आग लावल्याची घटना आज पहाटे घडली. या आगीत रेडियमच्या दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. अंदाजे चार लाखाचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. 

याबाबत मिळालेली माहिती अशी की शिवडाव येथील अरविंद नरे यांच्या मालकीचे रेडियमचे दुकान आहे. महामार्गावरील शिवसेना शाखे समोर हे त्यांचे दुकान आहे. म्हापणकर काॅम्पेल्कशेजारी त्यांनी स्टाॅल उभा केला होता. गेली काही वर्षे ते येथे गाड्यांना रेडियम लावण्याचा ते व्यवसाय करतात. या व्यवसायाच्या वादातून अनोळकी व्यक्तीने त्यांच्या दुकानाला आग लावल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी कणकवली पोलिस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली आहे. परिसरातील सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. यावरून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

Web Title: Sindhudurg News Radium Shop burn in Kankavali