सांगली जिल्ह्यातील शेतमजूर अपघातात ठार

अमोल टेंबकर
गुरुवार, 23 नोव्हेंबर 2017

सावंतवाडी - शेतात खुरपणी करीत असताना पाॅवर टिलरमध्ये अडकल्याने विरप्पा यशवंत टिळे (वय 50, रा. जत, जि. सांगली) येथील मजूर जागीच ठार झाला.

ही घटना मुंबई गोवा महामार्गाच्या बाजूला असलेल्या शेतात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मळगाव वेत्ये येथे घडली. त्यांच्या पत्नी रेणुका ही यावेळी तेथे काम करत होत्या. त्याच्यासमोर या अपघात घडला. पाॅवर टिलरमध्ये अडकल्यानंतर विरप्पा याने जोरदार आरडाओरड केला. या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली व त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र विरप्पा यांच्या  पोटात लोखंडी दात घुसल्याने ते जागीच ठार झाले. 

Web Title: Sindhudurg News Sangli labor dead in an accident