शुल्कवाढीचा सावंतवाडी बार असोशिएशनकडून निेषेध

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 जानेवारी 2018

सावंतवाडी - न्यायालयीन कामकाजासाठी बसलेल्या शुल्कात शासनाकडुन अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, ही वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप सावंतवाडी बार असोशिएशनने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी आज एक दिवशीय काम बंद आंदोलन केले. 

सावंतवाडी - न्यायालयीन कामकाजासाठी बसलेल्या शुल्कात शासनाकडुन अतिरिक्त वाढ करण्यात आली आहे, ही वाढ बेकायदेशीर असल्याचा आरोप सावंतवाडी बार असोशिएशनने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी त्यांनी आज एक दिवशीय काम बंद आंदोलन केले. 

यावेळी शुल्काचा दर वाढविण्यात आला असल्याने त्याचा फटका पक्षकाराला बसणार आहे. त्यामुळे याबाबत शासनाने पुर्नविचार करावा, अशी मागणी आज यावेळी संघटनेच्यावतीने करण्यात आली  याबाबत नायब तहसिलदार शशिकांत जाधव यांना निवेदन देण्यात आले.  

निवेदनात म्हटले आहे की, शासनाकडुन न्यायालयीन कामकाजासाठी लागणार्‍या शुल्कात भरमसाठ वाढ केली आहे, ही वाढ पक्षकारांसाठी अन्यायकारक असुन न्याय प्रकीया महागणार आहे. राज्यातील सामान्य जनतेला शेतजमिन तसेच अन्य कामासंदर्भात वारंवार न्यायालयात दाद मागण्यासाठी जावे लागते.  त्यामुळे न्यायालयीन कामकाजासाठी असणारे शुल्क कमी असणे आवश्यक आहे.  मात्र याचा विचार न करता शुल्क पाच पटीने वाढविण्यात आले आहे.  ही वाढ बेकायदेशीर व अन्यायकारक आहे.  वकीलपत्र घटस्फोटासाठी लागणारे अर्ज, जमिन अर्ज मुदतवाढ अर्ज, धनादेश वसुली दावा या सारख्या न्यायालयीन प्रकीयेसाठीच्या शुल्कात वाढ करण्यात आल्याने पक्षकारांच्या खिशाला कात्री लागणार आहे. याचा विचार करून शासनाने शुल्कात केलेली वाढ रद्द करणे आवश्यक आहे.

सावंतवाडी बार असोशिएशनचे अध्यक्ष परिमल नाईक, सुहेब डिंगणकर, सुभाष पणदुरकर, डी के गावकर, अनिल केसरकर, गोविंद बांदेकर, भालचद्र रेडकर, प्रविण काळसेकर,परशुराम चव्हाण, शामराव सावंत, बालाजी रणशूूर, सिध्दार्थ भांबूरे, प्रिया गावकर, सायली सावंत, प्रिया सावंत, स्वाती लिंगवत, ऐश्‍वर्या मुंज, मेघा गावडे आदी उपस्थित होते

Web Title: Sindhudurg News Sawantwadi Bar association agitation

टॅग्स