अनिल भिसे, चंदू सावंत यांना पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सावंतवाडी - येथील तालुका पत्रकार संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार छायाचित्रकार अनिल भिसे यांना जाहीर करण्यात आला आहे.  तर पांडुरंग स्वार यांच्या नावाने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जेष्ठ पत्रकार चंदू सावंत यांना जाहीर झाला आहे.

माजी आमदार जयानंद मठकर स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणार आदर्श पुरस्कार सिंदूधुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य अशोक करंबळेकर यांना, तर जेष्ठ पत्रकार बाप्पा धारकर आदर्श पुरस्कार अनिल चव्हाण तसेच सामाजिक कार्यकर्ते कै. चंदू वाडीकर यांच्या नावाने दिला जाणारा आदर्श समाजसेवक पुरस्कार दत्तप्रसाद पोकळे यांना जाहीर करण्यात आला.  

सावंतवाडी पत्रकार संघाच्यावतीने नेमण्यात आलेल्या निवड समितीची बैठक येथील शासकीय विश्रामगृहावर आज सकाळी पार पडली. यावेळी तालुकाअध्यक्ष विजय देसाई, सचिव अमोल टेंबकर, जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य  संतोष सावंत समिती सदस्य माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, पंचायत समिती सभापती रविंद्र मडगावकर आदी उपस्थित होते. 

Web Title: Sindhudurg News Sawantwadi Taluka Journalist organisation awards deceleration