सिंधुब्रह्म 2018 संमेलन उद्यापासून

अमोल टेंबकर
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

सावंतवाडी - सिंधुदुर्गच्या महाराष्ट्र ब्राह्मण मंडळाच्या 29 व्या सिंधुब्रह्म 2018 या जिल्हा संमेलनाचा प्रारंभ उद्या  6 जानेवारीला सावंतवाडी भटवाडी येथे होणार आहे. यावेळी गोव्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर उपस्थित राहणार आहेत.

हे वार्षिक संमेलन 6 व 7 जानेवारी रोजी सावंतवाडी भटवाडी येथील गोठोस्कर कशाळीकर ब्रह्मनगरी सभागृहात आयोजित केले आहे. याचा प्रारंभ शनिवारी सकाळी 9 :30 वाजता गोव्याचे बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते व उद्योगपती अरविंद राव गोगटे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यादिवशी उद्योजकता विकास यावर मार्गदर्शन, संध्याकाळी 4 ते 7 ब्रह्मदर्शन यात्रा, रात्री साडे आठ वाजता नाट्यसंगीत रजनी हा गीताचा बहारदार कार्यक्रम होणार आहे.

रविवारी 7 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता जिल्हास्तरीय स्त्रोत्र पठण स्पर्धा, जिल्हास्तरीय सत्कार, तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन, कृषी विषयक मार्गदर्शन, करिअर गाईडन्स, मुलासाठी करमणूक व संमेलन समारोप होणार आहे. तरी या संमेलनाला सर्व ज्ञाती बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजाराम चिपळूणकर व तालुकाध्यक्ष बाळ पुराणिक यांनी केले आहे.

Web Title: Sindhudurg News SindhuBramha 2018