ॲड. निरंजन डावखरेंना ‘स्वाभिमान’चे पाठबळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

सिंधुदुर्गनगरी - कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील भाजपचे उमेदवार ॲड. निरंजन वसंत डावखरे यांना माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे आणि स्वाभिमान पक्षाने जाहीर पाठिंबा दिला आहे. यामुळे विशेषतः सिंधुदुर्गात डावखरेंना पाठबळ मिळणार आहे.

माजी मुख्यमंत्री राणे यांची ॲड. डावखरे यांनी नुकतीच मुंबईत भेट घेतली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा पाठिंबा देण्याची विनंती केली. त्याला प्रतिसाद देत खासदार राणे यांनी डावखरेंना पाठिंबा दिला. या वेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. राणेंच्या पाठिंब्यामुळे डावखरे यांना निवडणुकीत दिलासा मिळाला आहे. ॲड. डावखरेंना पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाने प्रसिद्धीपत्रक काढले आहे.

पदवीधर मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी माजी खासदार निलेश राणे यांनी कोकण भवन येथे ॲड. निरंजन डावखरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. 

गेल्या सहा वर्षांत पदवीधर, बेरोजगार, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्याबाबत प्रयत्न केले. त्यातील अनेक मार्गी लागले आहेत. आगामी काळात मिशन-एज्युकेशनअंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासंदर्भात खासदार नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्याशी चर्चा झाली. त्याला दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
- ॲड. निरंजन डावखरे

Web Title: Sindhudurg News swabhiman support to Ad Nirajan Davakhare