पर्यटन विकास संथच!

नंदकुमार आयरे
सोमवार, 11 जून 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील पर्यटन विकासाची गाडी दर्जेदार कामाअभावी जाग्यावरच धूर काढत अडकली आहे. आतापर्यंत करोडो रुपयाचा पर्यटन निधी येऊनही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा अपेक्षित टप्पा गाठता आलेला नाही. दर्जाहीन कामे आणि आलेला निधी टक्‍केवारीत विभागला जात असल्याने पर्यटन विकासाचा दर्जा दिसेनासा झाला आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील पर्यटन विकासाची गाडी दर्जेदार कामाअभावी जाग्यावरच धूर काढत अडकली आहे. आतापर्यंत करोडो रुपयाचा पर्यटन निधी येऊनही जिल्ह्याच्या पर्यटन विकासाचा अपेक्षित टप्पा गाठता आलेला नाही. दर्जाहीन कामे आणि आलेला निधी टक्‍केवारीत विभागला जात असल्याने पर्यटन विकासाचा दर्जा दिसेनासा झाला आहे.

सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा म्हणून घोषित होऊन अनेक वर्षे लोटली. आतापर्यंत पर्यटन .िवकासावर करोडो रुपये खर्च झाले; मात्र पर्यटन विकासाची गाडी जाग्यावरच थांबलेली दिसत आहे. जिल्ह्यात पर्यटन विकासाचे मोठ-मोठे आराखडे, जागतिक दर्जाचे प्रकल्प आणण्याची स्वप्ने दाखविली जात आहेत; मात्र प्रत्यक्षात पर्यटकांना आकर्षित करेल, असा एकही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. 

केवळ जिल्ह्यातील समुद्र किनारे आणि नैसर्गिक सौंदर्य यावरच आतापर्यंत पर्यटकांना भूलविण्याचा प्रयत्न होत आहे. अन्य कोठे नाही, असे नावीन्यपूर्ण प्रकल्प राबविले जात नसल्याने आणि पर्यटनस्थळावर आवश्‍यक त्या सोयी सुविधा, रस्ते, वाहतूक याची सोय नसल्याने जिल्ह्याचा पर्यटन विकास गेली अनेक वर्षे जाग्यावरच राहिला आहे. जिल्ह्यात पर्यटनासाठी निधी मोठ्या प्रमाणावर आला; मात्र प्रत्यक्षात पर्यटन विकास संथच!

किती प्रभाविपणे निधी वापरला गेला हा प्रश्‍नच आहे. आलेला निधी प्रत्यक्षात कामांवर किती खर्च होतो हा न सुटनारा प्रश्‍न आहे. आलेला निधी पर्यटनाच्या नावाखाली टक्‍केवारीत विभागला जात असेल तर विकास आणि कामाचा दर्जा कसा रहाणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

सी-वर्ल्ड प्रकल्पाला राजकारण्यांचे ग्रहण
जिल्ह्याच्या भविष्यातील पर्यटनाची स्वप्ने रंगवली जात आहेत. घोषणाही मोठ-मोठ्या होतात; पण प्रत्यक्षात आतापर्यंत किती पर्यटन प्रकल्प अस्तित्वात आले आणि ते पूर्ण झाले हे सांगणे फारच कठीण आहे. पर्यटनदृष्या महत्त्वाकांक्षी असलेला सी-वर्ल्ड सारख्या प्रकल्पालाही राजकारण्यांचे ग्रहण लागलेले दिसत आहे. ते सुटेल तेव्हा प्रकल्प मार्गी लागेल अशीच स्थिती निर्माण झाली आहे.

निधी खर्चूनही रस्ते नाहीत
पर्यटन वाढीमध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका असलेल्या रस्ते विकासाचा विचार करता कोठ्यावधीचा निधी खर्चूनही काही ठिकाणी रस्तेच अस्तित्वात नाहीत. भ्रष्टाचारामुळे पहिल्याच पावसात रस्ते गायब झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनस्थळी पोचणेही कठीण बनले आहे. अनेक पर्यटनस्थळे अद्यापही दुर्लक्षीतच आहेत. याचा परिणामही पर्यटनावर होत आहे.

Web Title: Sindhudurg News tourism development issue