अवघ्या अडीच हजार पदवीधर मतदारांची नोंद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

सिंधुदुर्गनगरी - पदवीधर मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होणार असून त्यासाठीची मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी मतदार नोंदणीच्या अंतिम दिवस ६ नोव्हेंबरपर्यंत केवळ २ हजार ४१८ एवढीच पदवीधर मतदारांची नोंद झाली आहे. ही नोंद गत मतदार यादीच्या ५० टक्के एवढी कमी झाली आहे.

सिंधुदुर्गनगरी - पदवीधर मतदारसंघाची पंचवार्षिक निवडणूक लवकरच होणार असून त्यासाठीची मतदार यादी नव्याने तयार करण्यासाठी मतदार नोंदणीच्या अंतिम दिवस ६ नोव्हेंबरपर्यंत केवळ २ हजार ४१८ एवढीच पदवीधर मतदारांची नोंद झाली आहे. ही नोंद गत मतदार यादीच्या ५० टक्के एवढी कमी झाली आहे.

पदवीधर मतदारसंघासाठी पूर्णपणे नव्यानेच मतदार यादी बनविण्यात येणार असल्याने या पूर्वी ज्यांची नावे या मतदार यादीत समाविष्ट होती, अशा सर्वांनी पुन्हा नव्याने नोंदणी करणे अनिवार्य आहे. त्यामुळे पुरवणी यादी कार्यक्रम २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत होणार आहे. अद्यापही ज्यांनी आपली नोंदणी केली नाही त्यांना ही अखेरची संधी असणार आहे.

पदवीधर मतदारसंघाची पाच वर्षांची मुदत फेब्रुवारी २०१८ मध्ये संपत आहे. या मतदारसंघासाठी २०१२ मधे झालेल्या निवडणुकीत कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे निवडून आले होते. त्यांचा कार्यकाल आता संपत असून, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात ही निवडणूक होण्याची शक्‍यता आहे. यासाठी नव्याने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम लावला होता. कार्यक्रमाची मुदत ६ नोव्हेंबरला संपली. अंतिम तारखेपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ २ हजार ४१८ च पदवीधर मतदारांची नोंद झाली आहे. या पूर्वीच्या मतदार यादीत तब्बल ५ हजार ५१ एवढी मतदारांची संख्या होती. त्यामुळे नव्याने तयार करण्यात आलेल्या मतदार यादीत गत मतदार यादी पेक्षा ५० टक्के कमी मतदारांची नोंद झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.

नव्याने मतदार यादी...
पदवीधर मतदार यादी ही पूर्णपणे नव्याने बनविण्यात येत आहे. त्यामुळे या पूर्वी या पदवीधर मतदार यादीत ज्यांची नावे नमूद होती अशा सर्वांनी पुन्हा नव्याने नावे नमूद करणे आवश्‍यक आहे. यासाठी आता अंतिम संधी असून २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या एक महिन्याच्या कालावधीत पुरवणी मतदार यादी करण्यात येणार आहे. त्यावेळी आपली नावे नोंद करावी, असे आवाहन जिल्हा निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Sindhudurg News two thousand five hundred Graduate voter registration