किल्ले सिंधुदुर्गासह शिवराजेश्वर मंदिराची डागडुजी करावी - वैभव नाईक

प्रशांत हिंदळेकर 
बुधवार, 21 मार्च 2018

मालवण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्गावरील  शिवराजेश्‍वर मंदिराच्या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गची व शिवराजेश्वर मंदिराची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. 

मालवण - छत्रपती शिवाजी महाराज यांचे सिंधुदुर्गावरील  शिवराजेश्‍वर मंदिराच्या वास्तूची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे किल्ले सिंधुदुर्गची व शिवराजेश्वर मंदिराची डागडुजी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक आमदार वैभव नाईक यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात केली आहे. 

येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक, शिवप्रेमी भेटी देतात. मात्र पर्यटकांना अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून न दिल्या जात असल्याने पर्यटकांना, शिवप्रेमींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शिवाय किल्ल्याची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील पहिले मंदिर म्हणून प्रसिद्ध असलेल्या शिवराजेश्वर मंदिर या किल्ल्यावर आहे. गोवा राज्य शासनाने आपल्या राज्यातील पुरातन वास्तू आणि पुरातन मंदिराचे जतन करणे तसेच जास्तीत जास्त पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी अशी मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तूची डागडुजी, लायटिंग यासारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तशाच प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेली पुरातन मंदिरे व ऐतिहासिक वास्तूची डागडुजी, लायटिंग सारखी सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. अशी मागणी श्री नाईक यांनी केली.

आमदार वैभव नाईक यांनी या अधिवेशनात मासेमारी तसेच पर्यटन विषयक महत्त्वाच्या विषयांवरही शासनाचे लक्ष वेधले. येथील किनारपट्टीवर कोट्यवधी रुपये खर्च करून आणलेली केरळ धर्तीवरील  हाउस बोट समुद्रामध्ये बुडाली जर हीच हाउस बोट स्थानिक नागरिकांच्या ताब्यात दिली असती तर स्थानिक तरुणांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला असता. जिल्ह्यात किनारपट्टी भागात पर्ससीननेट तसेच प्रखर झोतातील मासेमारीवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचेही आमदार नाईक यांनी सांगितले.  

Web Title: Sindhudurg News Vaibhav Naik Comment