सूर्याभोवतीचे खळे सिंधुदुर्गवासियांना भावले 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 मे 2018

कणकवली - सूर्याने खळे (रिंगण) केल्याचे विलोभनीय दृष्य आज जिल्हावासियांना पाहायला मिळाले. निसर्गाचा हा अनोखा आविष्कार निसर्गप्रेमींना भावला तर जुन्या जाणत्यांमध्ये अवस्थता जाणवली. सूर्याचे खळे हा वातावरणातील हिमकणांचा आविष्कार असला तरी असे झाल्यानंतर महागाई वाढते, दुष्काळ पडतो असा पूर्वापार समज असल्याने काही नागरिकांमध्ये अस्वस्थता जाणवली.

जिल्ह्याच्या अनेक भागात आज आग ओकणारा सूर्य तर काहीवेळा ढगाळ वातावरणाचा दिलासा असे चित्र होते. यात आज दुपारी बाराच्या सुमारास सूर्याभोवती गोलाकार प्रतिबिंब निर्माण झाल्याने सूर्याला खळे पडल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. सूर्य किंवा चंद्राला खळे पडले तर ते अशुभ मानले जाते. यावरून चर्चा रंगल्या. अगदी याचा संदर्भ राजकारण आणि नेत्यांशी जोडला गेला. 

सूर्याला खळे पडणे यावरून पूर्वी पावसाचाही अंदाज व्यक्‍त केला जात असल्याचे ज्येष्ठ मंडळींकडून सांगण्यात आले. सूर्याला किती प्रमाणात खळे पडले त्यावरून यंदा पाऊस कमी होणार की जास्त याचे आराखडे बांधले जात होते; मात्र गेल्या काही वर्षात हवामानशास्त्र विकसित झाल्याने सूर्याच्या खळ्यावरून बांधला जाणारा अंदाज विस्मृतीत गेला आहे. 

सूर्याचे खळे वातावरणात दिसणारा प्रकाशीय आविष्कार आहे. पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या हिमकणांमुळे आविष्कार दिसतो. साधारणतः पाच ते सात किमी उंचीवर तंतुमेघ नावाचे ढग असतात. त्यात हिमकणांचे प्रमाण खूप असते. कधी कधी यावरून मोठ्या प्रमाणावर किरणांचे अपवर्तन व प्रवर्तन होते. यामुळे रंगीत व पांढरी वलये व चाप दिसतात. हेच खळे होय. 
- अच्युत देसाई,
विज्ञान अभ्यासक कणकवली 

Web Title: Sindhudurg News waves surrounding Sun