सिंधुदुर्गात संचारबंदीचा फज्जा

सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत जास्त प्रमाणात गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे.
curfew
curfew

ओरोस (सिंधुदुर्ग) : राज्य शासनाच्या आदेशानुसार कोरोना साखळी तोडण्यासाठी बुधवारी रात्रीपासून सिंधूदुर्ग जिल्ह्यात लॉकडाऊन सुरु झाले. मात्र, कोरोनाचे वाढते रुग्ण व त्यासाठी लागू केलेले लॉकडाऊनबाबत जिल्ह्यातील नागरिक सीरियस नसल्याचे दिसून येत आहे. गुरुवारी सकाळी मोठ्या संख्येने नागरिक घराबाहेर पडले आहेत. जिल्ह्यातील काही बाजारपेठेत सुद्धा ग्राहकांची गर्दी झाली होती. त्यामुळे किमान सकाळच्या सत्रात तरी जिल्ह्यातील नागरिकांनी लॉकडाऊन मनावर घेतलेले दिसत नाही.

सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत जास्त प्रमाणात गेले काही दिवस कोरोनाचे रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणा हतबल झाली आहे. जिल्ह्यात बेड कमी पडू लागले आहेत. नवनवीन उपाययोजना करून प्रशासन थकले आहे. तरीही जिल्ह्यातील रुग्ण कमी होत नाहीत. अशा परिस्थितीत लॉकडाऊन हा एकमेव पर्याय उरला होता. राज्य शासनाने पंधरा दिवसांचे लॉकडाऊन लागू केल्याने कोरोनाची वाढती साखळी तुटणार आहे. मात्र, जिल्ह्यातील नागरिक याबाबत जबाबदारिने वागत नसल्याने अडचणीचे होणार आहे.

गेल्या आठवड्यात वीकेंडला झालेले लॉकडाऊन जिल्ह्यातील नागरिकांनी कडक पाळले होते. त्यामुळे पंधरा दिवसांचे लॉकडाऊन नागरिक कडक पाळतील, असे अपेक्षित होते. मात्र, गुरुवारी सकाळी तरी ती स्थिती दिसली नाही. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद असतानाही नागरिक बाजारपेठेत आल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे. जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना अडवत आहेत. मात्र, काही नागरिक खोटी कारणे सांगून फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com