गांधी योजना महाशिबिराला प्रतिसाद
गांधी योजना महाशिबिराला प्रतिसादsakal

सिंधुदुर्ग : गांधी योजना महाशिबिराला प्रतिसाद

मालवणातील उपक्रम;नवीन ७० प्रकरणे एकाच वेळी दाखल

मालवण : संजय गांधी निराधार योजनेसाठी कागदपत्रे जमवताना लाभार्थ्यांची होणारी अडचण विचारात घेऊन संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मंदार केणी, तहसीलदार अजय पाटणे यांच्या संकल्पनेतून येथील मामा वरेरकर नाट्यगृहात आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या विशेष महाशिबिराला गावागावांतील लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या शिबिरात १५३ उत्पन्नाचे दाखले, ९५ हयातीचे दाखले तत्काळ देण्यात आले. तर संजय गांधी निराधार योजनेची नवीन ७० प्रकरणे एकाच वेळी दाखल करून घेण्यात आली. या शिबिराला आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे कौतुक केले. महसूल प्रशासनाने याच धर्तीवर शिधापत्रिकेतील दुरुस्तीसाठी शिबिर आयोजित करावे, अशी सूचना नाईक यांनी महसूल प्रशासनाला केली. यावेळी तहसीलदार पाटणे, समिती अध्यक्ष केणी यांनीही मनोगत व्यक्त केले.

या शिबिरात नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, उदय मोंडकर यांच्यासह २७ तलाठी, ७ मंडल अधिकारी आणि तहसील कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन नागरिकांचे अर्ज स्वीकारण्याची कार्यवाही केली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, महेश जावकर, बाबी जोगी, शीला गिरकर, संमेश परब, उमेश मांजरेकर, नरेश हुले, प्रमोद कांडरकर, पंकज सादये, अरविंद मोंडकर, मंदार ओरसकर, प्रसाद आडवणकर, उदय दुखंडे, यशवंत गावकर, अनुष्का गावकर, सुनील पाताडे आदी उपस्थित होते.

यापुढेही शिबिरे घ्या

महसूल विभाग, वन विभाग आणि मालवण तहसील कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिराचा गरजू व्यक्तींनी लाभ घेतला. अशा योजनेचा लाभ घेण्यासाठी तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या माराव्या लागतात; मात्र आजच्या शिबिरामुळे या प्रक्रियेत सुसूत्रता येऊन लाभार्थ्यांचा आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांचा वेळ वाचला. यापुढेही असे शिबिर घ्यावे तसेच शिधापत्रिकाबाबतही शिबिराचे आयोजन करावे, असे नाईक यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com