Digital App: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढीने सभासदांच्या सोयीसाठी नव्या ॲपच्या माध्यमातून डिजिटल सेवांचा शुभारंभ केला असून, सहकार क्षेत्रात आधुनिकतेची नवी दिशा दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्या., सिंधुदुर्गनगरी यांच्या वतीने ओरोस येथे सभासद गुणवंत पाल्य गुणगौरव व सभासद अॅप अनावरण सोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. दळवी यांच्या हस्ते झाले.