सिंधुदुर्गला मोठा दिलासा; 15 ऑगस्टपासून सर्व दुकाने खुली

Unlock
Unlock esakal
Updated on: 
Summary

व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण करुन मास्कचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

ओरोस : 15 ऑगस्टपासून (15 august) जिल्ह्यातील सर्व दुकाने, उपहारगृहे, मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्व व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचे कोविड (covid-19) प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण किंवा दुसरा डोस घेऊन 14 दिवस पूर्ण असणे आवश्यक असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिले. यामुळे जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. (sindhudurg unlock)

Unlock
आंबोली-आजरा मार्गावर कारचा भीषण अपघात

या आदेशात त्यांनी खुली अथवा बंदिस्त उपहारगृहे आसन व्यवस्थेच्या 50 टक्के क्षमतेच्या अटींत राहून सुरु करण्याची परवानगी दिली आहे. उपहारगृह, बारमध्ये प्रवेश करताना मास्कचा वापर अनिवार्य असून याबाबत स्पष्ट सूचना ग्राहकांना देण्यात याव्यात. व्यवस्थापक, स्वच्छता कर्मचाऱ्यांसह सर्वांचे लसीकरण करुन मास्कचा वापर अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

Unlock
दोन आजाराशी झुंज देत चढली 'ती' लग्नाच्या बोहल्यावर

उपहारगृह किंवा बार आसन व्यवस्थेत आवश्यक तेथे निर्जंतुकीकरणाची तसेच सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात यावी. भोजनासाठी ग्राहकांकडून शेवटची मागणी रात्री 9 वाजेपर्यंत घ्यावी; मात्र पार्सल सेवा 24 तास सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे. 14 दिवसांतून एकदा आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. शॉपिंग मॉल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार असून लसीकरण केलेले प्रमाणपत्र फोटो, ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखवणे आवश्यक असणार असल्याचे त्यांनी या आदेशात सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Malvan Fish Prices Paplet Surmai Rates
Chiplun Municipality Meeting and ₹15 Lakh Allegation
Ratnagiri Political Drama
vishal khamesara
Marathi News Esakal
www.esakal.com