
सिंधुदुर्गमधील ओंकार हत्ती वनतारामध्ये जाण्याची शक्यता आहे.
esakal
हायलाइट
‘ओंकार’ हत्तीच्या पकड मोहिमेला परवानगी — सिंधुदुर्ग वनविभागाला अखेर ओंकार हत्तीला रेस्क्यू करण्याची अधिकृत परवानगी मिळाली असून, विशेष पथक त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे.
सावंतवाडी तालुक्यात हत्तीचा मुक्काम — ओंकार सध्या सावंतवाडीतील कास व सातोसे परिसरात स्थिरावला आहे आणि बागायती तसेच शेतीचे नुकसान करत आहे.
सुरक्षित रेस्क्यूसाठी विस्तृत तयारी — पुणे विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून, कर्नाटक व गोवा वनविभागाशी समन्वय साधून सुरक्षित ठिकाणी हत्तीला हलवण्याची तयारी सुरू आहे.
Vantara Elephant Centre : गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर काही दिवसांपासून बागायतीचे नुकसान करणाऱ्या ‘ओंकार’ हत्तीची पकड मोहीम (रेस्क्यू ऑपरेशन) वनविभागाच्या खास पथकाने हाती घेतले आहे. तशा प्रकारची परवानगीही सिंधुदुर्ग वन विभागाला मिळाली आहे. रेस्क्यू पथक ओंकारच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून आहे. लवकरच त्याला रेस्क्यू करण्यात येईल, अशी माहिती उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांनी दिली.