सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 3 जानेवारीला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक 3 जानेवारीला होणार आहे. जिल्हा परिषद विषय समिती सभापती निवडीनंतर आता अध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. अध्यक्षपदाच्या दावेदार संजना सावंत यांना मानले जात असले तरी या पदासाठी अनेकजण इच्छूक असल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाची लांबलेली प्रक्रीया अखेर काल (ता.24) विषय समितीच्या चारही सभापती निवडीनंतर पूर्ण झाली आहे. रेश्‍मा सावंत यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेले अध्यक्षपद निवडण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्‌टे यांनी 3 जानेवारीला दुपारी 3 वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात विशेष सभेचे आयोजन करून निवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे.

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अडीच वर्षासाठी सर्वसाधारण प्रवर्ग (महिला)साठी आरक्षीत आहे. त्यापैकी दीड वर्षाहून अधिक काळ रेश्‍मा सावंत यांनी अध्यक्षपदावर विराजमान राहील्या होत्या. त्यामुळे आता नव्याने या पदावर बसणाऱ्या अध्यक्षाला 8 ते 10 महिन्याचाच कालावधी मिळणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजना सावंत यांची वर्णी लागण्याची दाट शक्‍यता आहे. त्याशिवाय सावी लोके यांचेही नाव चर्चेत आहे. मात्र या पदासाठी अनेकजणी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडीनंतर जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई हे राजीनामा देण्याची शक्‍यता आहे. या पदासाठी इच्छूक असणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.

Web Title: Sindhudurg Zilla Parishad election will be held on 3rd January