सिंधुदुर्गः विषय समिती सभापतींची येत्या २४ ला निवडणूक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 डिसेंबर 2018

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतिपदांची निवडणूक ता. २४ ला होणार आहे. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका असल्याने सभापती ठरवताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे.

सिंधुदुर्गनगरी - जिल्हा परिषदेच्या विविध विषय समिती सभापतिपदांची निवडणूक सोमवारी ( ता. २४) होणार आहे. आगामी काळात विधानसभा आणि लोकसभा निवडणुका असल्याने सभापती ठरवताना पक्षश्रेष्ठींचा कस लागणार आहे. जिल्हा परिषदेत राणे समर्थक स्वाभिमानच्या सदस्यांचे बहुमत असले, तरी ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले आहेत. त्यामुळे काँग्रेस काय भूमिका घेणार, याची उत्सुकता आहे. 

कार्यकाल संपल्याने जिल्हा परिषद विषय समिती सभापतींनी राजीनामे दिले होते. आज समाज कल्याण समिती, महिला व बालकल्याण समितीसह अन्य दोन विषय समिती सभापतींची निवडणूक आज जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्‌टे यांनी जाहीर केली. त्यानुसार २४ ला दुपारी तीन वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात प्रक्रिया होणार आहे. 
सभापती निवडताना सत्ताधाऱ्यांना प्रादेशिक समतोल राखावा लागणार आहे. शिवाय बहुमत स्वाभिमानकडे असले तरी त्यांचे सदस्य काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेस त्यांना व्हिप बजावणार का, याची उत्सुकता आहे.

Web Title: Sindhudurg Zilla Parishad Subject Committee Chairman election