

Candidates and party workers during nomination and campaign activities
sakal
ओरोस : तब्बल नऊ वर्षांनी होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविलेले पाच जण निवडणूक मैदानात उतरले आहेत. उपाध्यक्ष पदाचा सभापती पद भूषविलेले सात जण निवडणूक रिंगणात आहेत तर यापूर्वी सदस्य म्हणून काम केलेले सहा उमेदवार पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत. अशाप्रकारे १८ जण पुन्हा जिल्हा परिषदेत येण्यासाठी निवडणूक रणांगणात उतरले आहेत तर ९६ नवीन चेहरे आपले नशीब आजमावत आहेत.