

Sindhudurg ZP And Panchayat Samiti Seats Go Unopposed To Mahayuti
Esakal
कणकवली, ता. २४ : सिंधुदुर्गात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीआधीच महायुतीला मोठे यश मिळाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २७ जानेवारीपर्यंत आहे; मात्र तत्पूर्वीच ५ जिल्हा परिषद गण आणि ६ पंचायत समिती गटातील युतीचे उमेदवार बिनविरोध ठरले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या ठिकाणी ठाकरे शिवसेनेच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे पक्षाच्या अस्तित्वासाठी धडपडणाऱ्या ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.