पहिल्याच पावसात मुंबई-गोवा महामार्ग खड्डेमय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गासह ग्रामीण रस्त्यांची खड्डे पडून पावसाळ्याच्या सुरवातीलाच बिकट अवस्था झाली आहे. रस्त्यावरील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. 

या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम भर पावसात सुरू आहे. आतापर्यंत बुजविण्यात आलेले रस्ते पहिल्या पावसातच वाहून जाऊन ‘जैसे थे’ स्थिती बनली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निधी खर्चासाठी भर पावसात सुरू असलेल्या मलमपट्टी कामाबाबत जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे कसाल येथे महामार्गावर सुरू असलेले काम ग्रामस्थांनी रोखत आपला संताप व्यक्त केला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली ते कुडाळ या दरम्यान मोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे. हे खड्डेमय रस्ते अपघातांचे कारण ठरत आहेत. सिंधुदुर्गनगरीसह जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांचीही दुरवस्था झाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पालकमंत्रीपदाचा कार्यभार घेताच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्ते वर्षभरात खड्डेमुक्त करणार असे आश्‍वासन जिल्हावासियांना दिले होते. याला तब्बल दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी त्यांच्या आश्‍वासनाची पूर्तता अद्याप झालेली नाही. त्यांनाही आपण दिलेल्या आश्‍वासनाची विसर पडलेला दिसत आहे.
रस्त्याच्या दुरुस्तीला भर पावसात प्रशासनाला मुहूर्त सापडला आहे.

सद्यस्थितीत रस्त्यातील खड्डे जोरदार पावसात भरले जात आहेत. कसाल येथे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम जोरदार पावसातच सुरू असल्याने तेथील ग्रामस्थांनी हे काम रोखले आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कार्यपद्धतीबाबत जनतेतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हयाच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासमोरील रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम गेल्या आठ दिवसांतच भर पावसात पूर्ण करण्यात आले; मात्र हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याने व त्यामध्ये डांबराचा वापरच न झाल्याने आठ दिवसांतच रस्त्याची स्थिती जैसे थे अशीच बनली आहे.

Web Title: sindhudurgnagari konkan news mumbai-goa highway road patchy