तंत्रज्ञानावर आधारित कौशल्याची गरज - दीक्षितकुमार गेडाम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 जून 2017

सिंधुदुर्गनगरी - जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, जिद्द, व चिकाटी अंगीकृत करावी. सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. त्यामुळे यावर आधारित असणारी नवनवीन कौशल्ये आत्मसात करा, असे प्रतिपादन जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी सुकळवाड येथील एमआयटीएम इंजिनिअरिंग व पॉलिटेक्‍निक संस्थेच्या तंत्रशिक्षण मेळाव्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. या वेळी ६०० विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण मार्गदर्शन देण्यात आले.

सुकळवाड येथील मेट्रोपोलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अँड मॅनेजमेंटने नुकतेच व्यावसायिक तंत्रशिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केले होते. एमआयटीएम आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याला विद्यार्थी व पालकांचा चांगला सहभाग लाभला. या वेळी श्री. गेडाम बोलत होते. व्यासपीठावर मालवण शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डी. आर. महाजन, सावंतवाडी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विजय जगताप, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता रोजगार अधिकारी आर. एन. वाकुडे, एमआयटीएमचे प्राचार्य डॉ. प्रकाश हुबळी, उद्योजक नारायण नार्वेकर, जयवंती बाबू फाऊंडेशनचे उपाध्यक्ष विनोद कदम, डिप्लोमा प्राचार्य एस. सी. नवले, मेळाव्याचे समन्वयक प्रवीण कुलकर्णी, विद्यार्थी पालक उपस्थित होते.

श्री. गेडाम म्हणाले, ‘‘येथील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे; परंतु योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याने व शैक्षणिक पर्याय उपलब्ध नसल्याने त्यांना त्यांच्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. विद्यार्थ्यांनी चिकाटी, मेहनत व जिद्द अंगी बाळगली तर यश दूर नाही.’’ व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन केल्याबद्दल एमआयटीएम कॉलेजचे कौतुक केले. या वेळी दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कारही गेडाम यांच्या हस्ते करण्यात आला.

आर. एन. वाकुडे यांनी कौशल्य विकास योजेच्या विविध अभ्यासक्रम आणि त्याची असणारी शैक्षणिक अर्हता याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले.

Web Title: sindhudurgnagari konkan news Technology-based skill needs