आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव

अमोल टेंबकर
सोमवार, 2 एप्रिल 2018

सावंतवाडी - आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आज येथे दिली ​

सावंतवाडी - आंबोली येथे पर्यटन पोलिस ठाणे सुरू करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे, अशी माहिती सावंतवाडीचे उपविभागीय पोलीस अधिकारी दयानंद गवस यांनी आज येथे दिली

सिंधूदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे पर्यटन स्थळ आहे. येथे तिन्ही राज्यातून पर्यटक वारंवार या ठिकाणी येत असतात. पावसाळी पर्यटनासाठी तसेच उन्हाळ्यातही येथे मोठी गर्दी असते. पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या ठिकाणी पोलिस ठाणे असने गरजेचे आहे. 

दरम्यान, अनिकेत कोथळे हत्याकांडानंतर या ठिकाणी संशयिताचा मृतदेह आणून टाकला होता. तसेच कोल्हापूर चंदगड येथील शिक्षकाचा मृतदेहही टाकला होता. अशा घटना वारंवार या भागात घडत आहेत. त्यामुळे वाढती गुन्हेगारी लक्षात घेता त्या ठिकाणी रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे. अलर्ट राहण्याच्या सूचना संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत, असे गवस यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे उपस्थित होते

Web Title: Sindudurg News Police station proposal from Amboli