माथेरानला जायची इच्छा आहे पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindudurg Tourist Required Matheran Mini Railway Train Kokan Marathi News

जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनी ट्रेन अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता.

माथेरानला जायची इच्छा आहे पण...

माथेरान (सिंधुदूर्ग)  : पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या माथेरानच्या राणीचे अर्थात मिनी ट्रेनच्या डब्यांची संख्या कमी असल्याने पर्यटकांना गैरसोईला सामोरे जावे लागत आहे. रेल्वे प्रवासी तसेच पर्यटकांकडून याविषयी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे; मात्र याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता याप्रश्‍नी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जुलैमध्ये अतिवृष्टीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव मिनी ट्रेन अनिश्‍चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला होता. पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर डिसेंबरच्या २६ तारखेला नेरळ-माथेरान ट्रायल घेतली गेली. सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने अमन लॉज-माथेरान मिनी ट्रेन शटल सेवा सुरू केली. ही शटल सेवा सहा डब्यांची केली आहे. यामध्ये तीन द्वितीय श्रेणी 
डबे, एक प्रथम श्रेणी डबा व दोन गार्ड डबे असे स्वरूप आहे.

हेही वाचा- चंद्रकांत पाटीलांची मिळाली सूचना आणि लगेच भाजप प्रेमींनी देवीला घातले साकडे..

पर्यटकांचा होतोय हिरमोड

एका फेरीत फक्त ११९ प्रवासी प्रवास करू शकतात; मात्र शटल सेवा सुरू झाल्याने पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढला आहे.
पर्यटकांचा वाढता ओघ लक्षात घेता हौशी पर्यटकांना या मिनी ट्रेनच्या सफारीचा आनंद घेता येत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे. काही लहान मुले व ज्येष्ठ व्यक्तींना तिकीट न मिळाल्याने त्यांना त्यांच्या खिशाला कात्री लावून इच्छित स्थळी जावे लागत आहे.

हेही वाचा- अखेर सापडलाच हा मास्टर माईंड....

 सुट्टी दिवशी पर्यटक जादा

याअगोदर शटल सेवेच्या फेऱ्या या आठ डबे लावून केल्या जात होत्या. त्या वेळेस पर्यटकांना मिनी ट्रेनचा पुरेपूर आनंद घेता येत होता. त्यामुळे रेल्वेच्या महसुलातही चांगली भर पडत होती; पण सध्या सुरू असलेल्या शटल सेवेचे सहा डबे फारच कमी पडत आहेत. रेल्वेला महसूलही कमी मिळत आहे. शनिवार व रविवारला पर्यटक पाच हजारांपेक्षा जास्त येतात. त्यामुळे मिनी ट्रेनच्या डब्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पर्यटकांकडून जोर धरू लागली आहे.

पर्यटकांची संख्या वाढली

अमन लॉज-माथेरान शटल सेवा सुरू होऊन एक महिना झाला आहे. त्यामुळे इथे पर्यटकांची संख्या वाढली आहे. मी या शटल सेवेने दररोज प्रवास करतो; पण काही वेळेस तिकीट न मिळाल्यामुळे पायपीट करावी लागते.
- पवन गडवीर, स्थानिक

 शटल डब्यांची संख्या वाढवावी

माथेरान आवडते डेस्टिनेशन आहे. त्यामध्ये मिनी ट्रेन हे आमचे आकर्षण आहे. त्यामुळे आम्ही माथेरानला मिनी ट्रेनची मजा घ्यायला जातो. या अगोदर शटल सेवेचे आठ डबे होते. त्यामुळे तिकीट मिळत होते; पण आता सहा डबे असलेली शटल धावत आहे. त्यामुळे तिकीट मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे रेल्वेने आठ डब्यांची शटल सेवा सुरू करावी.
- विशाल नावले, नाशिक