
दुबईत असलेले भारतीय विशेष करून कोकणी या मेळाव्यास हजेरी लावतात. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, अस्सल कोकणी पदार्थांची या महोत्सवात मेजवानी असते.
कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत ...
चिपळूण (रत्नागिरी) : शहरालगतच्या खेर्डी येथील खालूचा बाजा प्रसिद्ध आहे. सातासमुद्रापार असलेल्या दुबईत त्यांचा आवाज घुमला आहे. दुबईत भरवण्यात येणाऱ्या कोकण मेळाव्यात खेर्डीतील खालू बाजाला खास निमंत्रित केले होते. खालू बाजा वाजविण्यात तरबेज असलेले खेर्डीतील इम्तियाज चौगुले व सहकाऱ्यांनी दुबईवारी करीत रसिकांना आपल्या कलेने मंत्रमुग्ध केले .
हेही वाचा- पिंजऱ्यात मिळणार मगरींना जीवदान....
दुबईत अस्सल कोकणी पदार्थांची मेजवाणी
कोकणातील लोककला व खाद्य पदार्थाना बाजारपेठे मिळावी. यासाठी दुबईत दरवर्षी कोकण मेळाव्याचे आयोजन केले जाते. दुबईत असलेले भारतीय विशेष करून कोकणी या मेळाव्यास हजेरी लावतात. विविध प्रकारचे खाद्य पदार्थ, अस्सल कोकणी पदार्थांची या महोत्सवात मेजवानी असते. त्याचबराबेर सांस्कृतिक कार्यक्रमांचाही रेलचेल असते. या महोत्सवात चिपळूण शहरालगतच्या खेर्डी येथील खालू बाजा आणि लेझीम हा वाद्य-नृत्य प्रकार रंगत आणली. गेल्या तिन वर्षापासून त्यांच्या या वाद्याला दुबईत खास निमंत्रण असते.
हेही वाचा- निव्वळ पांढऱ्या तांबड्यासाठी 55 लाखांची उलाढाल -
इम्तियाजने आणला महाराष्ट्रात खालूचा बाज
इम्तियाज चौगुले यांनी संपुर्ण महाराष्ट्रात खालूचा बाजामध्ये नाव कमावले आहे. राज्यातील विविध भागात हिंदू-मुस्लिमांच्या लग्न सोहळा, तसेच राजकीय पुढाऱ्यांच्या प्रचार सभा, मेळावे व अन्य शुभकार्यात खेर्डीतील खालू बाजाला बोलावले जाते. सनईचे स्वर, ढोल, व टिमकी वाजवून उपस्थितांना मंत्रमुग्ध करण्यात येते. या खालू बाजाच्या तालावर लेझीम खेळणे सर्वांचेच आकर्षण असते. त्यामुळे या खालू बाजास सलग तिसऱ्यांदा दुबईत निमंत्रण मिळाले. या संचामध्ये यासीन गफर चौगुले, मयनुद्दीन चौगुले, आजित चौगुले, हे सनई वादक कलाकार आहेत.
दुबईत खालू बाजाला खास निमंत्रण
ढोल-ताशा, बॅंजो व डिजेच्या कर्कश आवाजाने कानावर मोठा ताण पडतो. मात्र सनई हे सुमधूर वाद्य ऐकायलाही बरे वाटते. त्याचा नाद, लय वेगळा असतो. वाद्याच्या तालावर पाय आपोआप थिरकतात. खालू बाजाला खास निमंत्रण मिळते.
यासीन चौगुले, सनईवादक खेर्डी, ता. चिपळूण
Web Title: Sindudurg Traditional Instrument Khalu Baja Dubai Kokan Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..