म्हणून गुहागर मधील त्या सहा जणांची होणार आता तपासणी... 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 मार्च 2020

शृंगारतळी येथे दुबईहून आलेल्या एका रुग्णाची प्रकृती ठीक नसल्याने त्याने शृंगारतळी येथील डॉक्टरकडे तपासणी केली होती.

चिपळूण ( रत्नागिरी ) : कोकणातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला त्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या शृंगारतळी मधील डॉक्टर ,नातेवाईक, चालक अशा तिघांचं अन्य तीन अशा सहा जणांची कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती तहसीलदार धोत्रे यांनी पत्रकारांना दिली.

शृंगारतळी येथे दुबईहून आलेल्या एका रुग्णाची प्रकृती ठीक नसल्याने त्याने शृंगारतळी येथील डॉक्टरकडे तपासणी केली होती. दुबईहून मुंबईत आल्यानंतर याच कोरोनाबाधित रुग्णास शृंगारतळी येथील एका चालकाने चिपळूण मधून शृंगारतळी येथे आणले होते. या चालकाला रत्नागिरी येथे चार दिवसापूर्वी कोरोना चाचणीसाठी नेले होते. त्यावेळी त्याच्यासोबत आई-वडीलही होते. तीन दिवस तेथे ठेवल्यानंतर रविवारी त्याला चाचणी न देता सोडण्यात आले होते.

पहिला कोरोनाग्रस्त शृंगारतळीतच

हेही वाचा- कामाच पैसे मिळाल्यावर धान्य आणू ; आता गर्दीत गर्दी नको.. अस ती म्हणाली अन्

त्यानंतर पुन्हा एकदा या चालकाला व त्याच्यासोबत संपर्कात राहिलेल्या आई-वडिलांनची रत्नागिरी येथे चाचणी करण्यात येणार आहे. तसेच गुहागर शहरातही जर्मनीतून आलेल्या युवतीला होम क्वॉरटाईन करून ठेवण्यात आले आहे. या युवतीची ही चाचणी होणार असल्याचे सांगण्यात आले. शुंगारतळी परिसर आयसोलेट केल्यानंतर येथील लोकांना जीवनावश्यक आणि किराणा वस्तू खरेदी करता यावा यासाठी शृंगारतळी मधील काही दुकाने वरिष्ठांच्या आदेशाने उघडण्यात येतील मात्र ग्रामस्थांनी गर्दी करू नये असे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

 हेही वाचा- गड्या आपला गाव बरा म्हणत 40000 लोक दाखल ; 13 हजार कर्मचारी लढ्यासाठी सज्ज

दहा देशातून​ आले हे प्रवासी

गुहागर तालुक्यात दहा देशातून आपल्या मूळ गावी परतलेल्या 32 ग्रामस्थांना घरातच विलग करून ठेवण्यात आले आहे. तर 6 जणांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 18 जणांपैकी 14 जण घरात तर 4 जणांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. अशी एकूण देखरेखीखाली ठेवणाऱ्या ग्रामस्थांची संख्या 56 वर पोहोचली आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The six persons will be examined in Guhagar kokan marathi news