गोठ्याला आग; 16 जनावरे जळली

सुनील पाटकर
मंगळवार, 24 एप्रिल 2018

टोळ बुद्रुक येथे महमद सालेह हुर्जुक यांचा गोठा असुन या गोठ्याला आज दुपारी अचानक आग लागली.

महाड - तालुक्यातील टोळ बुद्रुक गावातील एका गोठ्याला आज दुपारी अचानक लागलेल्या आगीत 16 जनावरे जळून मरण पावली तर दोन जनावरे गंभीर भाजली आहेत. आगीचे कारण समजू शकलेले नाही. 

टोळ बुद्रुक येथे महमद सालेह हुर्जुक यांचा गोठा असुन या गोठ्याला आज दुपारी अचानक आग लागली. वीटकाम केलेला व छपराला पत्रे असलेल्या या गोठ्यातील पाच हजार पेंढा जळून खाक झाला. गोठ्यात आग पसरल्याने गोठ्यातील बकऱ्या, बैल, रेडा व कुत्रा आगीत होरपळून मरण पावले तर दोन म्हशी गंभीररित्या भाजल्या आहेत. स्थानिक नागरिकांनी हि आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Sixteen Animals Burned in Fire

टॅग्स