अवैध कत्तलखान्यात साडेपाचशे किलो गुरांचे मांस; सात जणांना अटक

सुनील पाटकर
रविवार, 12 ऑगस्ट 2018

महाड : महाड तालुक्यातील भोमजाई मोहल्ला येथील एका गोठ्यामध्ये सुरु असलेला बेकायदेशीर कत्तलखाना पोलिसांनी उध्वस्त केला असुन साडेपाचशे किलो गुरांचे मांस, सात जीवंत गुरे व दोन वाहने असा सुमारे दहा लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कत्तल करणा-यांना रंगेहाथ पकडले असुन सात जणांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसातील गोवंश हत्येतील तालुक्यातील ही तिसरी घटना आहे. भोमजाई मोहल्ला येथील एका गोठ्यामध्ये गुराची कत्तल होत असल्याची अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने पथकांनी आज पहाटे चार वाजता येथ छापा टाकला. यावेळी या ठिकाणी चार जण हमिद महालदार याच्या गोठ्यात चोरलेल्या गुरांची कत्तल करतांना सापडले. येथे पोलिसांना विक्रीसाठीचे साडेपाचशे किलो गुरांचे मांस सापडले तसेच कत्तलीसाठी चोरलेली बैल व वासरे अशी सात जीवंत गुरे सापडली. हे मांस परस्पर विकण्यासाठी नेण्याकरीता येथे एक कार व टेंपोही होता शिवाय कत्तलीसाठी वापरलेली हत्यारेही सापडली. पोलिसांनी हा सर्व सुमारे दहा लाखांचा एवज जप्त केला आहे. या प्रकरणी हमिद महालदार, शब्बीर महालदार, शरिफ महालदार (सर्व रा.भोमजाई मोहल्ला), सलमान शेख एजाज कुरेशी, महम्मद अन्यारी व सहिद कुरेशी (सर्व रा.कुर्ला-मुंबई) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस नाईक राजेंद्र गाणार यांनी महाड तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केला आहे
 
Web Title: In the slaughter house, meat of five and a half kilos of animals and seven persons arrested