
AI video turns Raigad into a snowy wonderland; social media users in awe.
Sakal
-अमित गवळे
पाली: रायगड जिल्ह्यातील शहरे आणि गावे बर्फाने अच्छादित झाल्यासारखे दिसणारे AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. 'काश्मीर नाही अलिबाग’, ‘स्नो फॉल इन पाली’ 'रायगड हिमाच्छादित' अशा मथळ्यांखाली हे व्हिडीओ व्हॉट्सऍप स्टेटस, इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाले आहेत. हे व्हिडीओ पाहून लोक अचंबित होत आहेत.