esakal | कुटुंबावर दु:खाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण

बोलून बातमी शोधा

कुटुंबावर दु:खाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण
कुटुंबावर दु:खाचा डोंगर; मुलाच्या मृत्यूनंतर वडिलांनीही सोडले प्राण
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी : विवाहित तरुण मुलाच्या (Younger) मृत्यूच्या धास्तीने अवघ्या आठ दिवसातच वडिलांनी (Father)देखील प्राण (Dead)सोडले. मुलगा व वडील अशा एकाच कुटुंबातील (Family) दोघांचा अवघ्या आठ दिवसात मृत्यू झाल्याने सांगेली-सावरवाड गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या या अचानक जाण्याने पवार कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला आहे.

सावरवाड-पवार टेंब येथील रावजी विश्राम पवार (वय 68) तर मुलगा आनंद रावजी पवार (वय 35) असे या दोघा पिता-पुत्राची नावे आहेत. मुंबई-विरार (Mumabi-Virar) येथे गेल्या कित्येक वर्षापासून पवार कुटुंबीय नोकरीनिमित्त वास्तव्यास आहे. त्यांचे मुळ गाव सावरवाड आहे. गेल्या आठ दिवसांपूर्वीच मुलगा आनंद रावजी पवार याची प्रकृती खालावल्याने त्याला खाजगी रुग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल केले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा: सावधान! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; ही आहेत लक्षणे

मुलाच्या अचानक जाण्याने वडील व त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. मुलाला अग्नी दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसातच रावजी पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. तरुण होतकरू मुलाच्या अशा अचानक जाण्याने त्याच्या वडिलांनी धास्ती घेतली. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मुलाचे दुःख सावरता सावरता त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांवर दुःखाचा आघात झाला आहे.