esakal | सावधान! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; ही आहेत लक्षणे

बोलून बातमी शोधा

सावधान! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; ही आहेत लक्षणे
सावधान! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा लहान मुलांना धोका; ही आहेत लक्षणे
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये लहान (child) मुलांनाही कोरोना (Covid-19)व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण वाढले आहे. या लाटेतल्या संसर्गादरम्यान मुलांमध्ये कोव्हिडची लक्षणे दिसून येत आहेत. कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेदरम्यान लहान मुले किंवा कुमारवयीन मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण फारसे नव्हते. पण दुसऱ्या लाटेदरम्यान मात्र 18 वर्षांपर्यंतच्या वयोगटातल्या रुग्णांची संख्या वाढलेली दिसते.

कोरोनाच्या व्हायरसमध्ये बदल घडून झालेले नवीन स्ट्रेन, मुलांचे खेळायला घराबाहेर पडणे, घरातल्याचे बाहेरून येणे अशी कारणे या रुग्णसंख्येमागे आहेत. मुलांवर कोरोना विषाणूचा हल्ला होण्यामागे विषाणूमध्ये झालेले म्युटेशन (बदल) असू शकत असल्याचे तज्ज्ञांचे (Doctors, Experts) म्हणणे आहे. हवामानात बदल झाला की लहान मुलांना सर्दी, खोकला आणि ताप येणे सामान्य आहे. मात्र आता लहान मुलांच्या ओपीडीमध्ये (OPD) रुग्ण आला की त्याला कोव्हिड टेस्ट (Covid -19 Test) करण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.

हेही वाचा: पाचव्या फेरीतही विरोधकांची घोडदौड सुरूच

गेल्या वर्षाच्या तूलनेत या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग जास्त आहे. काहीवेळा मुलांना संसर्ग होतो आणि त्यानंतर संपूर्ण कुटुंबाला आजार होतो. परंतु यातील सकारात्मक गोष्ट म्हणजे लहान मुलांना व्हायरसमुळे गंभीर आजार होत नाही किंवा त्यांची प्रकृती अधिक बिघडत नाही. कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या मुलांमध्ये नेहमीच्या ताप, घसा खवखवणं यासोबतच इतर काही लक्षणे आढळून येतात. लहान मुलांना नेहमी होणाऱ्या पोट बिघडणे, उलट्या होणे याच्याशी या लक्षणांचे साधर्म्य असल्याचे बालरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणून मुलांचे पोट बिघडले किंवा दुखू लागले, उलट्या झाल्या तर त्याचा संबंध कोरोनाशीही असू शकतो.

मुलांना त्यांचे पालक वा कुटुंबातल्या कोणाकडून तरी कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता असते. बहुतेक मुलांमध्ये अगदी सौम्य लक्षणे दिसून आली आहेत. काहींना जास्त ताप भरल्याचेही आढळले. यासोबतच काही वेगळी लक्षणेही आढळून आली आहेत. तोंडाची चव गेल्याची, वास येणे थांबल्याचे लहान मुलांना सांगता येणार नाही. पण मुलांनी अचानक खाणे कमी करणे, हे याचे लक्षण असू शकते. पण मुले लवकर बरी होतात. मोठ्यांप्रमाणे लहान मुलांवर आयसीयूमध्ये दाखल करण्याची वेळ येत नाही. तरीही लहान मुलांना कोरोनापासुन जपण्याचा सल्ला डॉक्टर अनेक पालकांना देत आहेत.

मुलांमध्ये सामान्य लक्षणे अशी...

  • सौम्य ताप, पोट बिघडणे, उलट्या होणे, डोकेदुखी, बेशुद्ध पडणे

  • सतत चिडचिड करणे

  • अंगावर पुरळ येणे

  • डोळे लाल होणे

हेही वाचा: बेळगाव लोकसभेत कॉंग्रेस चितपट; भाजपच्या मंगला अंगडी ठरल्या पहिल्या महिला खासदार

मुलांची कोव्हिड चाचणी कधी करावी?

जर पालकांपैकी कोणी पॉझिटिव्ह असेल तर ते मूल पॉझिटिव्ह असण्याची शक्यता दाट असते. मुलांमध्ये लक्षणे दिसत असल्यास त्यांची चाचणी करून घ्यावी. मुलांना लक्षणे आढळल्यास घ्यायची खबरदारी घ्यावी लागते.

अशी घ्या काळजी...

मुलांना ताप आला तर त्यांना घरीच ठेवा. ताप उतरल्यावर खेळायला पाठवू नका. हा ताप हवामान बदलामुळे आलेला असू शकतो, पण सोबतच कोरोनाचे ही लक्षणं असू शकते. लगेच डॉक्टरांना संपर्क करा. मुलांमध्ये कोरोनासारखी लक्षणे वाटत असल्यास घराबाहेर पडू नका. आजारी पडलेले मूल 2 वर्षांपेक्षा मोठं असेल, तर त्यांनाही मास्क घालावा.

दृष्टीक्षेपात...

  • जिल्ह्यातील बाधित मुलांची संख्या ( वर्षभरात )

  • 1 वर्षा पर्यत - 85

  • 1 ते 10 वर्ष - 2390

  • 11 ते 20 वर्ष - 4730

हेही वाचा: ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी महाराष्ट्राला मिळाले इतके लाख डोस

"सध्या कोरोनाचा दुसरा स्ट्रेन आहे. गेल्या वर्षा पेक्षा यावेळी कोव्हिडची वेगळी लक्षणे आहे. या लाटेत लहान मुले अधिक बाधित होण्याची कारणे ही पालकांची बेजबाबदारपणात दडली आहे. योग्य ती काळजी न घेतल्याने मुलांना कोरोनाचा धोका वाढला आहे. लक्षणे दिसताच मुलांवर उपचार होणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणारी मुले कोरोनातून लगेच बाहेर येतात."

- डॉ. प्रमा बाफना (बालरोग व नवजात शिशू तज्ज्ञ)