मंडणगड : सोनल बेर्डेची चिठ्ठी ठरवणार सत्तेची खुर्ची?

समान मतांनंतर नशिबाची साथ; राष्ट्रवादी काँग्रेसला बसला धक्का
Sonal Berde
Sonal Berdesakal
Updated on

मंडणगड : येथील नगरपंचायत निवडणुकीत(Nagar Panchayat Election) प्रभाग क्रमांक १ आदर्शनगरमध्ये निवडणूक अत्यंत रंगतदार झाली. सुमित्रा निमदे (शहर विकास आघाडी) व सोनल बेर्डे (अपक्ष) (Sonal Berde) या दोन्ही उमेदवारांना समान ६२ मते मिळाली. त्यामुळे ईश्वरी चिठ्ठी काढून त्यात बेर्डे या विजयी घोषित करण्यात आल्या. सोनल बेर्डे यांना लाभदायक ठरलेली ईश्वरी चिठ्ठी सत्तेची खुर्ची ठरवणार, अशी खुमासदार चर्चा सुरू आहे.

Sonal Berde
नागपूर : चाइल्ड पोर्नोग्राफीबाबत सहा जणांवर गुन्हे

हा प्रभाग गतवेळी सचिन बेर्डे यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होता; मात्र या वेळी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांच्या पत्नी सोनल या अपक्ष लढून विजयी झाल्या आहेत. हीच ईश्वरी चिठ्ठी आता सत्ता स्थापनेत निर्णायक भूमिका वठवण्याची शक्यता आहे. प्रभाग ४ व ५ मध्ये राष्ट्रवादीला धक्का बसला. प्रभाग क्र. ४ शिवाजीनगरमध्ये मुश्ताक दाभिळकर (अपक्ष) ११७, दीपक घोसाळकर (राष्ट्रवादी) ६३, श्रीपाद कोकाटे (काँग्रेस)३३, कल्पेश शिंदे (मनसे) २३, विजय पोटफोडे (अपक्ष) ४, संजय राणे (अपक्ष) ७, अशी मते मिळाली. ही बहुचर्चित लढत शहर विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार मुश्ताक दाभिळकर यांनी जिंकली असून नगरपंचायतमध्ये प्रथमच मुस्लिम समाजाचा उमेदवार निवडून आणल्याचा दावा शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला आहे.

Sonal Berde
नागपूर : उॅंट मर गए तो मेनका गांधी मुआबजा देंगी क्या?

लेंढे यांचा पराभव

प्रभाग ५ साईनगरमध्ये राजाराम लेंढे (राष्ट्रवादी- ९४ मते) यांचा शहर विकास आघाडीचे अपक्ष उमेदवार योगेश जाधव यांनी १२९ मते घेत पराभव केला. दोन भाऊ विजयी झाले प्रभाग क्रमांक ११ धनगरवाडीमध्ये विनोद जाधव ८९ मते घेऊन विजयी झाले तर त्यांचेच भाऊ योगेश जाधव हे १२९ मते घेत प्रभाग क्रमांक ५ साईनगरमधून निवडून आल्याने नगरपंचायतीत प्रथमच दोन भाऊ नगरसेवक म्हणून काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

353rd Shivrajyabhishek Day celebration held at Raigad Fort with Eknath Shinde
Marleshwar Temple waterfall safety advisory
Teacher Eligibility Test
Malvan resort swimming pool accident video viral
Marathi News Esakal
www.esakal.com