दक्षिणायन चित्रपट महोत्सवामुळे  स्त्री अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याला गती 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

कणकवली- "स्त्रियांच्या स्वातंत्र्यासाठी, अभिव्यक्‍तीसाठी विविध राज्यांत आणि महाराष्ट्रात पन्नास ठिकाणी याच स्त्री केंद्रित चित्रपटाचे आयोजन होतेय. यातून स्त्रीच्या अभिव्यक्‍तीला अधिकाधिक गती मिळणार आहे,' असे मत डॉ. शमिता बिरमोळे यांनी येथे व्यक्त केले.
 
कलमठ येथील काकडे सभागृहात दक्षिणायन चित्रपट महोत्सवाचा प्रारंभ झाला. सखी साऱ्याजणी ग्रुप आणि सिंधुदुर्ग चित्रपट संस्था यांच्यातर्फे झालेल्या या कार्यक्रमाच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. शमिता बोलत होत्या. या वेळी अर्पिता मुंबरकर, कवी अजय कांडर, सिंधुदुर्ग चित्रपट संस्थेचे संतोष काकडे आदी उपस्थित होते. 

डॉ. बिरमोळे म्हणाल्या, ""दक्षिणायन चित्रपट महोत्सव कणकवलीत होण्यामध्ये संतोष काकडे यांचे मोठे सहकार्य आहे. स्त्रीला केंद्रस्थानी ठेवून या महोत्सवासाठी चित्रपट निवडले आहेत. यामुळे स्त्रीच्या शोषणाची बाजू लोकांसमोर येण्याला मदत होणार आहे.'' 

कवी अजय कांडर म्हणाले, ""डॉ. देवी यांच्या संकल्पनेतून दक्षिणायन चळवळ सुरू करण्यात आली. आता अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्या संकल्पनेतून दक्षिणायन चित्रपट महोत्सव आयोजित करून स्त्रीच्या अभिव्यक्‍ती स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.'' 

संतोष काकडे म्हणाले, ""दक्षिणायन चित्रपट महोत्सव कणकवलीत होणे चांगली घटना आहे. जिल्ह्यात आता स्थानिक पातळीवरूनही चित्रपटनिर्मिती होत आहे. अशा महोत्सवामुळे चित्रपट निर्माण करण्याची अधिकाधिक समज वाढेल.'' या वेळी संजना काकडे, अर्पिता मुंबरकर, डॉ.. प्रतिभा नाटेकर, सौ. शिर्के यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी मिर्च मसाला चित्रपट दाखविण्यात आला. 

Web Title: southern film festival helped women empowerment