esakal | जाणून घ्या, डाव्या हाताने आशीर्वाद देणाऱ्या जर्मन गणेशमुर्ती विषयी
sakal

बोलून बातमी शोधा

special story on german ganesh murti

देवरुखमधील मूर्तीकार उदय भीडे दरवर्षी तयार करतात मूर्ती

जाणून घ्या, डाव्या हाताने आशीर्वाद देणाऱ्या जर्मन गणेशमुर्ती विषयी

sakal_logo
By
प्रमोद हर्डीकर

साडवली : गणरायाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. कोकणात गणेशोत्सवाला अनन्यसाधारण असे महत्व आहे. कोकणात सण, उत्सवात अनेक रुढी परंपरा आहेत आणि त्याचे निरंतर पालन केले जाते. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे हा वारसा पुढे चालत राहिल्याने या प्रथा-परंपरांना शेकडो सालांचा इतिहास आहे.

हेही वाचा - राजापूर मधील व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ही मागणी...

देवरुख येथील घरगुती गणेशोत्सवातही अशा परंपरा पाहायला मिळतात. देवरुख आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र घाणेकर यांच्या निवासस्थानी गणेशोत्सवात पुजल्या जाणाऱ्या गणेशमूर्तीला जर्मन गणेश म्हणून संबोधले जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य असे आहे, की ही गणेशमूर्ती उजव्या हाताने आशीर्वाद देण्याऐवजी डाव्या हाताने आशीर्वाद देते अशी भक्तांची धारणा आहे. अशी गणेशमूर्ती मुद्दाम तयार करुन घ्यावी लागते आणि ती देवरुखमधील मूर्तीकार उदय भीडे दरवर्षी तयार करुन देतात.

हेही वाचा -  सिंधुदुर्गात मत्स्यखवय्यांनी केली समुद्रकिनारी गर्दी ; काय कारण ? 

जर्मन गणेशाचा इतिहास कुठेही लिखित स्वरुपात उपलब्ध नाही. मात्र घाणेकरांकडे दरवर्षी याच जर्मन गणेशाचे पुजन केले जात आहे. या गणेशाची आराधना करणारी ही तिसरी पिढी आहे. आणि घरगुती गणेशोत्सवातील ही आगळी वेगळी परंपरा आजही जोपासली जाते  हे विशेष आहे. डाव्या हाताने आशीर्वाद देणारी जर्मन गणेशमुर्ती देवरुखवासियांसाठी कुतुहलाचा विषय ठरत आली आहे. २२ तारखेला चतुर्थीला या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे.

संपादन - स्नेहल कदम