एनडीए परीक्षार्थींसाठी कोकणातून धावणार रेल्वेच्या तीन विशेष गाड्या  

राजेश कळंबट्टे
Saturday, 5 September 2020

उपस्थित राहू इच्छिणाऱ्या परीक्षार्थींना या विशेष गाड्यांचा उपयोग होणार आहे. 

रत्नागिरी : नॅशनल डिफेन्स अॅकॅडमी आणि नेव्ही अॅकॅडमीच्या परीक्षार्थींच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर मुंबई ते सावंतवाडी, मुंबई ते मडगाव आणि कोल्हापूर ते मडगाव या मार्गावर विशेष गाड्या धावणार आहेत. उपस्थित राहू इच्छिणाऱ्या परीक्षार्थींना या विशेष गाड्यांचा उपयोग होणार आहे. 

हेही वाचा - बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी ;  शक्कल लढविल्यामुळे वाचले प्राण

मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी या मार्गावर शुक्रवार, ४ सप्टेंबर आणि रविवार, ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता विशेष गाडी (क्र. 01135/01136) सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून १० मिनिटांनी सावंतवाडीला पोहोचेल. त्याच दिवशी दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी ही गाडी परतीच्या प्रवासासाठी निघेल आणि रात्री ११ वाजता पोहोचेल. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या ठिकाणी थांबेल. ही गाडी २४ डब्यांची असेल. दुसरी गाडी (क्र. 01147/01148) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगा व या मार्गावर शनिवारी, ५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी रवाना होईल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ४ वाजता मडगावला पोहोचेल. 

हेही वाचा - वाह! पापलेट 400 रुपये किलो; जाळ्यात सापडताहेत मोठ्या प्रमाणात मासे; खवय्यांना पर्वणी

परतीच्या प्रवासासाठी ही गाडी रविवारी, ६ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता निघेल आणि सोमवारी दुपारी १ वाजून ५ मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, सांगली, मिरज, बेळगाव आणि लोंढा या स्थानकांवर थांबून मडगावला पोहोचणार आहे. ही गाडी २२ डब्यांची आहे. तिसरी गाडी (क्र. 01149 / 01150) कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज स्थानकावरून मडगावसाठी सुटणार आहे. ही गाडी शनिवारी ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता रवाना होऊन आणि रविवारी पहाटे ४.३० वाजता मडगावला पोहोचेल. ही गाडी मिरज, बेळगाव आणि लोंढा स्थानकावर थांबणार आहे. गाडीला २४ डबे असतील. 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: special trains are running from konkan rail road for NDA students in konkan