अरे वाह! पापलेट 400 रुपये किलो; जाळ्यात सापडताहेत मोठ्या प्रमाणात मासे; खवय्यांना पर्वणी

प्रमोद जाधव
Saturday, 5 September 2020

चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात पापलेट सापडत आहेत. त्यामुळे या माशाचे भाव प्रतिकिलो 1200 रुपयांवरून 400 ते 600 रुपये झाला आहे. खवय्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे. 

अलिबाग : चार दिवसांपासून रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या जाळ्यात मोठ्या प्रमाणात पापलेट सापडत आहेत. त्यामुळे या माशाचे भाव प्रतिकिलो 1200 रुपयांवरून 400 ते 600 रुपये झाला आहे. खवय्यांसाठी ही पर्वणी ठरली आहे. 

वादळी वाऱ्यामुळे जून, जुलै या दोन महिन्यांत मासेमारीला बंदी होती. त्यानंतर मासेमारीला सुरुवात केली झाली होती; परंतु ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पावसामुळे मासेमारीला जाण्यास सरकारकडून बंदी घालण्यात आली. त्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुसळधार पावसाने जोर धरल्याने त्यावेळी मच्छीमारांना मासेमारी करता आली नाही. आता पावसाने विश्रांती घेतल्याने मोठ्या संख्येने मासेवारी करत आहेत. या मच्छीमारांना चार दिवसांपासून पापलेटची लॉटरी लागली आहे. 

सविस्तर वाचा : कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही; गृहमंत्री अनिल देशमुखांची तीव्र प्रतिक्रिया

दरम्यान, कोरोनामुळे मासळीची निर्यात थांबल्याने पापलेट स्थनिक बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मच्छीमारांनी दिलेल्या माहितीनुसार चार दिवसांत सुमारे 70 टन पापलेट जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत. चार दिवसांपूर्वी मोठ्या आकाराचे पापलेट 1200 रुपयांपेक्षा अधिक भावाने विकण्यात येत होती. आता त्याचा भाव 400 ते 600 रुपये आहे, असे ही मच्छीमारांनी सांगितले. 

अधिक वाचा : स्टंटबाजी जीवावर बेतली, सूर्या नदीत बुडून तरुणाचा मृत्यू

सध्या कोरोनामुळे मासळीची निर्यात थांबली आहे. त्यात जिल्ह्यात शीतगृहाचा अभाव असल्याने पापलेट तातडीने बाजारात विकावे लागत आहेत. त्यामुळे त्याचे भाव घसरले आहेत. हा मच्छीमारांसाठी मोठा आर्थिक फटका आहे. 
- शेषनाथ कोळी, अध्यक्ष, रायगड जिल्हा मच्छीमार संघ

(संपादन : उमा शिंदे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Paplet Fish is now in 400 Rs. Kg