वेळ आली होती पण काळ आला नव्हता...

st bus accident in kudal kokan marathi news
st bus accident in kudal kokan marathi news

कुडाळ (सिंधुदुर्ग) : लक्ष्मीनारायण विद्यालय बिबवणे येथे अचानक बाँक्सवेलमधून सर्विस रोडवर आलेल्या मालवाहक आयशर टेंम्पोला वाचविण्याच्या प्रयत्नात शिवापूरहुन कुडाळला जाणाऱ्या एस.टी. बसला आज  अपघात झाला. सुदैवाने बस चालकाच्या प्रसंगावधानमुळे  मोठा अनर्थ टळला.

एस.टी. बस सर्विस रोड वरील संरक्षक कठडा तोडत गटारावर चढली. एसटी बस चालकाने प्रसंगावधान राखत गाडी गटारावर चढवल्याने मोठा अनर्थ टळला. बस प्रवाशांनी भरलेली होती. बस ट्रकवर आदळली असती, तर मोठा अपघात घडला असता. दुसर्‍या बाजूला शाळा होती. मात्र मुले नसल्याने मोठा अनर्थ टळला. बस चालकाच्या या प्रसंगावधानाचे कौतूक होत आहे.

बस चालकाच्या प्रसंगावधानमुळे अनर्थ टळला

मात्र मालवाहक आयशर टेम्पो चालकाने बाँक्सवेलमधून सर्विस रोडवर येत असताना आजुबाजुला का पाहिले नाही? अशी घटनास्थळी चर्चा होती. एस.टी. बस अचानक थांबवणे शक्य नव्हते. घटनास्थळी पोलिस दाखल झाले,  अपघाताला नेमके जबाबदार कोण? याबाबत तपास करत आहेत. यापूर्वी सदर सर्विस रोडवर हायवे ठेकेदार यांच्या कडुन गतिरोधक घालण्यात आला होता. परंतु नव्याने डांबरीकरण केल्याने संबंधित गतिरोधक बुजला गेला, यामुळेच कदाचित वाहनांच्या वेगावर नियंत्रण राहत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com