रक्षाबंधननिमित्त एसटी बस फुल्ल

अमित गवळे 
रविवार, 26 ऑगस्ट 2018

पाली : रक्षा बंधन निमित्त बहिण आणि भाऊ एकमेकांना भेटण्यासाठी निघाले होते. त्यामुळे परिवहन मंडळाच्या बस आणि मिनीडोअर रिक्षा फुल्ल होत्या. बस स्थानकावर देखील प्रवाश्यांनी मोठी गर्दी केली होती. पाली बसस्थानकात देखील मोठ्या प्रमाणात गर्दी होती.

येथील गाव व खेड्यात जाण्यासाठी मिनीडोअर व बस मधून प्रवासी दाटीवाटीने प्रवास करत होते. रविवारची एकच सुट्टी असल्याने मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी शाळा, सरकारी व खाजगी कार्यालये खुली होती. त्यामुळे अनेक जण रविवारी पुन्हा परतीला निघाले असल्याने मोठी गर्दी झाली होती. तसेच महामार्गावर देखील वाहनांची मोठी वर्दळ होती.
 
Web Title: ST bus full for Rakshabandhan festival