एसटी वाहतुकीस तिलारी घाट बंद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

दोडामार्ग - तिलारी घाटातून होणारी एसटीची वाहतूक आजपासून बंद करण्यात आली. कोल्हापूर, चंदगड, राधानगरी आणि वेंगुर्ले आगारांच्या गाड्या यामार्गे धावतात. कोल्हापूर, बेळगाव ते पणजी-सावंतवाडी या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी हा मार्ग जवळचा आहे; मात्र घाटरस्ता बंद केल्याने या सगळ्या गाड्या आंबोली घाटमार्गे वळविल्या आहेत. 

कोल्हापूर, बेळगाव येथून दोडामार्ग-सावंतवाडी, पणजीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तिलारी घाटमार्ग जवळचा आहे. तो जवळचा असला तरी साधारणपणे घाटातील सात किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब आहे. तीव्र वळणे, तीव्र चढ-उतार आणि त्यात रस्त्यात पडलेले मोठ-मोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी होत आहे. घाटरस्ता तिलारी जलविद्युत प्रकल्पाचा आहे. तो सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतर झालेला नाही. तिलारी प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्याने तिलारीनगर ते पायथ्यापर्यंतचा रस्ता ते क्वचितच वापरतात. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती कशी, या प्रश्‍नामुळे रस्त्याचे काम रेंगाळले आहे. 

Web Title: ST bus locks off Tilari Ghat