ST रत्नागिरी उभारतेय सीएनजी पंप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एसटी’च्या विभागीय कार्यालयाशेजारी सीएनजी गॅस पंपाच्या उभारणीचे काम सुरू झाले.

ST रत्नागिरी उभारतेय सीएनजी पंप

रत्नागिरी : कोरोनातील परिस्थितीमुळे तिजोरीवर पडलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी एक हजार गाड्या ‘सीएनजी’त रूपांतरित करण्याचा निर्णय राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने घेतला आहे. त्या दृष्टीने रत्नागिरीतही हालचाली सुरू झाल्या असून, ‘एसटी’च्या विभागीय कार्यालयाशेजारी सीएनजी गॅस पंपाच्या उभारणीचे काम सुरू झाले. ‘सीएनजी’वर चालणाऱ्‍या २०० बसची मागणी रत्नागिरी विभागाने केली आहे. त्याबरोबरच सुमारे १२५ ते २०० इलेक्ट्रिक बसची मागणी महामंडळाकडून करण्यात आली.

कोरोना टाळेबंदीमुळे एसटीची प्रवासी संख्या कमी झाली. कर्मचाऱ्‍यांच्या संपामुळे वाहतूक पूर्णत: ठप्प झाली होती. त्याचा परिणाम उत्पन्नावर झाला. डिझेलच्या दरातही दिवसेंदिवस वाढ होते. महामंडळाच्या ताफ्यात डिझेलवर धावणाऱ्‍या १७ हजार बस असून, डिझेलवर होणारा खर्च हा एकूण खर्चाच्या ३४ टक्के इतका आहे. डिझेलच्या किमती वाढत असल्याने हा खर्च ३८ ते ४० टक्क्यांवर पोचला. हा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यासाठी ‘सीएनजी’बरोबरच इलेक्ट्रिक, एलएनजी अशा पर्यावरणपूरक इंधनावर धावणाऱ्‍या बसचा विचार केला जात आहे.

राज्यात एक हजार गाड्यांचे ‘सीएनजी’मध्ये रूपांतर करण्यात येणार आहे. या रिट्रोफिटमेंटसाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला निधी देईल. रत्नागिरी विभागात पहिल्या टप्प्यात २०० गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. एसटी बसच्याशेजारी असलेल्या मोक्याच्या जागेत सीएनजी गॅस पंपाची उभारणी सुरू झाली. पायाभरणीचे काम पूर्ण झाले असून, सहा महिन्यांत गॅसपंपाची उभारणी पूर्ण होईल. त्याच कालावधीत ‘सीएनजी’वर रूपांतरित झालेल्या बस रत्नागिरीत दाखल होणार आहेत. इंधनाचा पर्यायी वापर करताना केवळ ‘सीएनजी’वर अवलंबून न राहता इलेक्ट्रिक बसचाही वापर केला जाईल. रत्नागिरी विभागाने १२५ ते २०० गाड्यांची मागणी पहिल्या टप्प्यात केली आहे

इंधनावरील खर्च कमी करण्यासोबत प्रदूषणमुक्त गाड्या वापरावर भर देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. त्या अंतर्गत रत्नागिरी विभागात ‘सीएनजी’ व इलेक्ट्रिक गाड्या लवकरच एसटी विभागाच्या ताफ्यात दाखल होतील. त्यादृष्टीने आवश्यक तयारी आणि सीएनजी पंपाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे.

- प्रज्ञेश बोरसे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी

Web Title: St Ratnagiri Erection Cng Pump

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :RatnagiriKokanSTCNG Pump
go to top