
सिंधुदुर्गातील ST च्या १७०० फेऱ्या सुरू
कणकवली: सिंधुदुर्गातील नियमित २१०० फेऱ्यांपैकी सध्या १७०० फेऱ्या सुरू झाल्या आहेत. तसेच या फेऱ्यांना प्रवाशांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असल्याने एसटी महामंडळाला दिलासा मिळाला आहे. सध्या सुरू असलेल्या एसटी फेऱ्यांमधून विभागाला प्रतिदिनी २८ लाख ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. तर पूर्वीच्या नियोजनानुसार अजूनही ४०० फेऱ्या सुरू होण्याची प्रतीक्षा प्रवाशांना आहे. दरम्यान संपामुळे पाच महिने एसटी सेवा प्रभावित राहिली होती. यात सिंधुदुर्ग एसटी विभागाला ४५ कोटींचे नुकसान झाले आहे.
पाच महिन्याच्या संपानंतर सिंधुदुर्गात २२ आणि २३ एप्रिल रोजी संपावर गेलेले सर्व कर्मचारी हजर झाले. त्यानंतर पुढील पाच दिवस चालकांना प्रशिक्षण देण्यात आले. तर महाराष्ट्र दिनापासून सिंधुदुर्गातील एसटी सेवा सुरळीत झाली आहे. विवाह समारंभासाठी जादा बसेस उपलब्ध करून दिल्या जात आहेत. तसेच एसटीची माल वाहतूकही पुन्हा सुरू झाली आहे. सिंधुदुर्गात एसटी विभागात २१२१ कर्मचारी आहेत. यातील १३५० कर्मचाऱ्यांनी संपात सहभाग कायम ठेवला होता.
Web Title: St Sindhudurg Started 1700 Rounds
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..