Pali News : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर स्थगित; सोमवारपासून कार्यालये गजबजणार

राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे.
government office work

government office work

sakal

Updated on

पाली - राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी २१ एप्रिल २०२६ पासून पुकारलेला बेमुदत संप अखेर स्थगित करण्यात आला आहे. मुख्य सचिव आणि कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, शनिवार (ता. 25) पासून आरोग्य विभागाचे कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत. तर शासकीय कार्यालयात सोमवार (ता. 27) पासून नियमित कामकाज सुरु होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com