पालीत महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची राज्यस्तरीय बैठक

अमित गवळे 
शुक्रवार, 29 जून 2018

पाली (जि. रायगड) - महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ (र. जि.) यांच्या वतीने कंत्राटदारांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. 28 ) येथील बल्लाळेश्वर देवस्थान भक्त निवास क्र.1 येथे करण्यात आले होते. या बैठकीस 20 जिल्ह्यातील ठेकेदारांचा सहभाग.

पाली (जि. रायगड) - महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ (र. जि.) यांच्या वतीने कंत्राटदारांच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन गुरुवारी (ता. 28 ) येथील बल्लाळेश्वर देवस्थान भक्त निवास क्र.1 येथे करण्यात आले होते. या बैठकीस 20 जिल्ह्यातील ठेकेदारांचा सहभाग.

महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघाने आजवर ठेकेदारांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने आवाज उठविला असून शासनस्तरावर विविध मागण्यांचा पाठपुरावा करुन त्या मार्गी लावण्याचे काम केले आहे. ठेकेदारांना शासनस्तरावर काम करताना अनेक अडचणी व समस्या निर्माण होतात. मंत्रालयस्तरावर ठेकेदारांना भेडसावणारे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटना ठेकेदारांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून व्यापक स्वरुपाचा लढा देणार असल्याची भुमिका राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी स्पष्ट केली.

या बैठकीच्या प्रारंभी पालीतील ठेकेदार सुधीर जोशी यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. राज्यभरातील कंत्राटदारांनी दैनंदिन काम करताना भेडसावणारे प्रश्न व समस्या मांडल्या. या समस्या मंत्रालयस्तरावर सोडविण्याच्या दृष्टीकोनातून विचारविनिमय करुन राज्य संघटननेने पुढील आंदोलनाची दिशा व भुमिका स्पष्ट केली. या बैठकीत राज्य स्तरावरील डी.एस.आर. रद्द करणे, मोठ्या निविदा निच्छीत करणे, जी.एस.टी व इतर कर, ठेकेदारांनी केलेल्या कामाची रखडणारी बिले वेळेत मिळणे. या बैठकीत, मध्यम ठेकेदारांना मिळणार्‍या कामात होत असलेला अन्याय, निधी वेळेत उपलब्ध होणे आदी महत्वपुर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. याबरोबरच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हायब्रिड ऍन्युइटी पध्दतीचा टेंडरचा वापर करण्याकरीता संयुक्तीक निविदा काढण्यात आल्याने कंत्राटदारांचा अशा पध्दतीला प्रतिसाद मिळत नाही. परिणामी जिल्ह्यातील रस्त्याची कामे रखडली जावून रस्त्याची दुर्दशा होताना दिसते. यावर महाराष्ट्र शासनाने सकारात्मक विचार करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या बैठकीस महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाचे राज्य अध्यक्ष मिलिंद भोसले, राज्य कार्यकारी अध्यक्ष इंजि. संजय मैद, राज्य महासचिव सुनिल नागराळे, महावीर पाटील, तसेच सुधागड ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी प्रकाश पालरेचा, मिलिंद ठोंबरे, शिरीष सुळे, विराज मेहता, स्वप्णिल वर्मा, धनराज सागळे, विक्रम परमार, शरद जाधव, शांताराम बोरकर, राजू पिचिका आदिंसह राज्यभरातील ठेकेदार उपस्थित होते.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

Web Title: State Level Meetings of Maharashtra State Contractor's Federation of Pali